शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

विक्रमसिंह घाटगेंचे नाव सहकारात अजरामर

By admin | Published: April 16, 2015 12:34 AM

सर्व पक्षीयांची आदरांजली : शोकसभेस मोठी गर्दी : मान्यवरांकडून राजेंच्या कार्याचा वारसा जपण्याचे आवाहन

कागल : विक्रमसिंह घाटगेंच्या रूपाने सहकारातील दीपस्तंभ उन्मळून पडला आहे. स्फटिकासारखे स्वच्छ-पारदर्शी-विश्वासार्हता-नैतिकता याचे दुसरे नाव म्हणजे राजेसाहेब होते. सहकारातील नवे कायदे-बदल असोत, अथवा महाराष्ट्रातील साखर कारखानदारीचे प्रश्न असोत, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असो, अंतिमत: विक्रमसिंह घाटगेंचाच सल्ला घेत. त्यांचे नाव देशाच्या सहकारक्षेत्रात अजरामर राहील, अशा शब्दांत बुधवारी विक्रमसिंह घाटगेंना सर्वपक्षीय शोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकसभेसाठी मान्यवर मंडळीसह त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी झाली होती. येथील शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.खासदार धनंजय महाडिक म्हणाले, राजेसाहेबांच्या आग्रहामुळेच मी लोकसभेच्या मैदानात उतरलो. मला सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी विचारत की शाहू साखर कारखाना एवढा दर देऊ शकतो तर तुम्ही का देऊ शकत नाही. असे भरीव काम त्यांनी केले. माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले, विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनाने केवळ कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे, तर महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. सहकार चळवळीत कोणाच्या तोंडाकडे बघायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदार हसन मुश्रीफ म्हणाले की, राजघराण्याचा सुखी संपन्न वारसा असतानाही राजेंनी अत्यंत खडतर परिस्थितीशी संघर्ष करत कागलमध्ये छ. शाहू साखर कारखाना उभारला. त्यांच्यामुळेच तालुक्यात परिवर्तनाची लाट आली.यावेळी माजी आमदार संजय घाटगे, आमदार उल्हास पाटील, के. पी. पाटील, काकासाहेब पाटील, डॉ. श्रीकृष्ण देशमुख, बजरंग देसाई, भरमुअण्णा पाटील, नामदेवराव भोईटे, डॉ. इंद्रजित मोहिते (कराड), बापूसाहेब पुजारी (सांगली), सुभाष जोशी (निपाणी), क्रांती साखरचे अरुण लाड, रयत साखरचे जयसिंगराव पाटील, कॉ. दिलीप पाटील, नगराध्यक्ष आशाकाकी माने, रणजितसिंह पाटील, शंकरराव पाटील-शिंगणापूरकर, विजयसिंह मोर, कृष्णा साखर कारखान्याचे सुरेश पाटील, शेतकरी संघटनेचे भगवान काटे, प्रा. जालिंदर पाटील, पी. जी. मेढे, सभापती पिन्टू लोहार, राजेंद्र जाधव, घटप्रभा कारखान्याचे प्रकाश पाटील, डॉ. निरंजन शहा, नम्रता कुलकर्णी, विलास मगदूम, बाबगोंडा पाटील, अतुल जोशी, आदींची भाषणे झाली.आमदार वीरकुमार पाटील यांनी प्रास्ताविक करून श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. शिवराम भोजे, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड,एस. के. मगदूम, विजय औताडे, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)घाटगेंशिवाय पहिला कार्यक्रमशाहू साखर कारखान्याच्या या कार्यस्थळावर गेल्या ३५ वर्षांत विक्रमसिंह घाटगेंशिवाय असा कोणताच मोठा कार्यक्रम झाला नव्हता. बुधवारी शोकसभेच्या निमित्ताने हा पहिला कार्यक्रम झाला. अत्यंत शिस्तबद्धपणे, व्यवस्थित संयोजनातून शोकसभा घेण्यात आली. प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचा शोकसंदेशही वाचून दाखविण्यात आला.समरजितसिंहाच्या पाठीशी राहुयाया शोकसभेत सर्वच वक्त्यांनी विक्रमसिंह घाटगेंच्या आकस्मिक निधनाने घाटगे परिवार आणि शाहू ग्रुप पोरका झाला आहे. कधीही भरुन येणार नाही अशी पोकळी निर्माण झाली आहे, असे सांगून समरजितसिंह घाटगेंच्या पाठीशी उभे राहून राजेंचे कार्य पुढे नेऊया अशा भावना व्यक्त केल्या.