सरवडे : सरवडे (ता. राधानगरी) हद्दीत उजवा कालव्याच्या अलीकडे पलीकडे जाण्यासाठी गाव पूल, तसेच अस्तरीकरणामुळे पाणी पाझर बंद होणार असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी औटलेट करावा, अशी मागणी माजी पं. स. सदस्य आर. के. मोरे व शेतकरी शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी अस्तरीकरणाच्या कामास वरील बाजूस पडलेल्या भेगा व काम पातळीत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
काळम्मावाडी प्रकल्पाअंतर्गत उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाने काम युद्धपातळीवर सुरू आहे; पण कालव्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाणे अवघड होते. शेतकऱ्यांना वरील बाजूच्या शेतीची मशागत व अन्य कामे करणे जिकिरीचे होते. तरी या हद्दीत गावपूल व्हावे अशी मागणी मोरे यांनी केली. तसेच अस्तरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे कालव्याच्या खालील बाजूस पाण्याचा पाझर बंद होऊन पिकांना मिळणार नाही म्हणून अस्तरीकरण सुरू असतानाच या ठिकाणी औटलेट बसवावे व गावांच्या शेजारी अस्तरीकरणामुळे कालव्यात उतरणे अवघड होणार असल्याने या ठिकाणी पायऱ्या कराव्यात, अशी मागणी करीत अस्तरीकरणास पडलेले स्क्रॅच, पुलाच्या ठिकाणी योग्य भरावा नाही, तर कामात खबडबे आहेत. लेवल दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा अडचणी येऊ शकतात, असे मतही मोरे यांनी व्यक्त केले. उपअभियंता अजिंक्य पाटील यांनी मागणीनुसार सर्व ठिकाणची पाहणी करून यासंबंधी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी दिग्विजय मोरे, डी. के. पाटील, शामराव पाटील, रंगराव रेपे, शामराव केसरकर, संजय जरग यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
....... १२ सरवडे पाहणी फोटो सरवडे (ता. राधानगरी) येथील उजवा कालवा हद्दीत आर. के. मोरे, अजिंक्य पाटील, दिग्विजय मोरे, आदींनी पाहणी केली.