लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार सुमारे ९०० गावांतील मंडळांनी घेतला आहे. त्याचबरोबर ३०४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्यात आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ७ हजार १३० मंडळांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.गणेशोत्सव डॉल्बीविरहित करण्याची परंपरा गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरू आहे. त्याला संपूर्ण जिल्ह्यातून भरघोस प्रतिसादही मिळत आहे. यंदाचाही गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने जनजागृती केली जात आहे. जिल्ह्णांतील गावा-गावांत सार्वजनिक मंडळांच्या बैठका घेऊन गणेशोत्सव शांततेत व डॉल्बीविरहित साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे. त्याला मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिसाद दिला असून ३०४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ व सुमारे ९०० गावांत ‘डॉल्बी मुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. कोल्हापूर शहरात राजारामपुरी-शाहूनगर कॉलनीत सामूहिकरित्या गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय झाला आहे.पोलीस उपविभागीय हद्दीनुसार आकडेवारीविभाग मंडळे एकगणपतीकोल्हापूर शहर ९२२ ०१करवीर १७२८ १५इचलकरंजी १४८७ ०१जयसिंगपूर १०२१ ०३शाहूवाडी १३६३ ९७गडहिंग्लज ६०९ १८७
३०४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:04 AM