शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 4:22 PM

गेल्या वर्षीच्या महापुराने दिलेल्या धड्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सजग झाली आहे. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती आराखडे तयार करण्याच्या सूचना पूरबाधित गावांना देण्यात आल्या आहेत. येत्या ७ जूनपर्यंत हे आराखडे गावांनी तालुका आणि तालुक्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

ठळक मुद्देआराखडे सादर करण्यासाठी ७ जूनपर्यंत मुदत आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिक सजग

कोल्हापूर : गेल्या वर्षीच्या महापुराने दिलेल्या धड्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सजग झाली आहे. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती आराखडे तयार करण्याच्या सूचना पूरबाधित गावांना देण्यात आल्या आहेत. येत्या ७ जूनपर्यंत हे आराखडे गावांनी तालुका आणि तालुक्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.दरवर्षी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत संभाव्य पुराच्या अनुषंगाने आराखडे तयार करून यंत्रणा तैनात केली जाते; पण गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराने सर्व यंत्रणेवर ताण आला. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी इतर नुकसान मोजण्याच्या पलीकडचे होते.  या पार्श्वभूमीवर यंदा अधिक दक्षता बाळगत पूरबाधित गावांना संभाव्य आराखडे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या आराखड्यांत गावात किती पाऊस होतो, अतिवृष्टी होणारी ठिकाणे, किती लोक पूरबाधित होऊ शकतात, त्यांच्या स्थलांतराची, निवाऱ्याची काय व्यवस्था असणार, आपत्तीचा सामना करण्यासाठी कोणत्या प्रकारची साधनसामग्री उपलब्ध आहे, कोणती आवश्यकता आहे, याची विस्तृत माहिती द्यावी लागणार आहे. आराखडा तयार झाल्यानंतर गावांनी तालुका तहसीलदारांकडे , तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तो सादर करावयाचा आहे.आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्कजिल्हाधिकारी कार्यालयात असलेला आपत्ती व्यवस्थापन कक्ष १ जूनपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. आताही ३५ कर्मचाऱ्यांमार्फत तीन पाळ्यांमध्ये रात्रंदिवस काम चालते; पण १ जूनपासून यात पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, महसूल या यंत्रणांतील आणखी १० जण समाविष्ट करून घेतले जाणार आहे. ४५ जणांसह हा कक्ष ऑक्टोबरपर्यंत अहोरात्र सुरू राहणार आहे.जिल्ह्यातील पूरबाधित गावेशिरोळ ४२, हातकणंगले २३, करवीर ५७, कागल ४१, राधानगरी २२, गगनबावडा १९, पन्हाळा ४७, शाहूवाडी २५, गडहिंग्लज २७, चंदगड ३०, आजरा ३०, भुदरगड २३

गेल्या वर्षासारखाचा पूर यंदाही येईल, असे गृहीत धरून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कामाला लागली आहे. जनजागृती व सज्जता तपासण्यासाठी आपत्तीतील बचावाची प्रात्यक्षिकेही घेतली जात आहेत.प्रसाद संकपाळ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर