शाहूवाडी :
शाहूवाडी तालुक्यात ४३ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी मतदान होत असताना चनवाड - शाहूवाडी गावात शांतता पसरली आहे. शाहूवाडी नगर पंचायत व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीवर बहिष्कार टाकला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शाहूवाडी ग्रामस्थांचा विविध माध्यमातून शाहूवाडी नगरपंचायत करावी या मागणीसाठी लक्ष वेधले आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानतंर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्ह्यात एकीकडे चुरशीने मतदान होत असताना शाहूवाडीत मात्र शुकशुकाट आहे.
राज्य सरकारकडून तालुक्याच्या ठिकाणी असणारया गावांला नगरपंचायत देण्याचा निर्णय आठ वर्षांपूर्वी घेतला होता. त्या निर्णयाने शाहूवाडी गावाला नगरपंचायत मंजूर असूनही कार्यवाही झालेली नाही. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.