करवीर तालुक्यातील उजळाईवाडी येथे चिकनगुण्यासदृश आजाराने ग्रामस्थ त्रस्त आहेत. सांधेदुखी व तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. आरोग्य विभागाकडील मलेरिया टीमकडून गावात सर्व्हेक्षण सुरू आहे. ग्रामपंचायत स्तरावर औषध फवारणी करण्यात येत आहे.
करवीर तालुक्यातील उजळाईवाडी येथे चिकनगुण्यासदृश आजाराने ग्रामस्थ त्रस्त आहेत. सांधेदुखी व तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले. रक्त नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. तर काही रुग्णांवर औषध उपचार करण्यात आले आहेत.
संपूर्ण गाव, कॉलनी परिसरातील प्रत्येक घरात सांधेदुखी व तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. याबाबत आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. पथकाने सर्व्हेक्षण सुरू करून कुटुंबनिहाय माहिती घेतली आहे. घरातील पाणी साठ्यांचीही पाहणी केली आहे. नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. ग्रामस्थांना औषधे वितरित केली आहेत. आरोग्य विभागाकडून चिकनगुण्यासदृश आजारासंदर्भात ग्रामस्थांना सर्व्हेक्षणाव्दारे माहिती दिली जात आहे, अशी माहिती आरोग्यसेविका आर. बी. लाड यांनी दिली.