शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
3
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
4
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
5
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
6
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
7
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
8
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
9
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
11
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
12
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
13
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
14
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
15
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
16
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
17
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
18
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
19
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
20
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात

Kolhapur: गेली २० वर्षे पंचगंगेचे प्रदूषण करणारी गावेच ठरेनात, शास्त्रशुद्ध तपासणी नसल्याने प्रस्ताव नाकारुन परत

By समीर देशपांडे | Published: June 19, 2024 1:21 PM

समीर देशपांडे कोल्हापूर : गेली २० वर्षे पंचगंगेचे प्रदूषण करणारी गावे किती आहेत हेच जिल्हा परिषदेला ठरवता आलेले नाही. ...

समीर देशपांडेकोल्हापूर : गेली २० वर्षे पंचगंगेचे प्रदूषण करणारी गावे किती आहेत हेच जिल्हा परिषदेला ठरवता आलेले नाही. मग उपाययोजना कशी करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. अव्वाच्या सव्वा गावांची संख्या घालून प्रस्ताव पाठवले गेले आणि ते नाकारून परत आले. नेमक्या किती गावांमुळे प्रदूषण होते याची शास्त्रशुद्ध तपासणी करून मगच निधीची मागणी करण्याची गरज असताना अधिकारी बैठकीत ठरल्याप्रमाणे नुसते प्रस्तावावर प्रस्ताव पाठवत सुटले आहेत.पंचगंगा नदीकाठच्या ३९ गावांमधून विनाप्रक्रिया सांडपाणी नदीत मिसळते आणि त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढते, असे सांगण्यात येते. परंतु, जिल्हा परिषदेकडून याआधी गावांची संख्या वेगवेगळी सांगितली गेल्याने यामध्ये घोळच होत गेला आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या तुलनेत ग्रामीण भागातून कमी सांडपाणी मिसळले जात असताना बोट मात्र या गावांकडे दाखवण्यात येते आणि अधिकारीही गावांची संख्याही बदलून सांगत असल्याने गैरसमजाला बळ मिळाले आहे.तुळशी, कुंभी, कासारी, भोगावती या चार प्रत्यक्षातील आणि दिसून येत नसलेली सरस्वती या नद्यांची मिळून पंचगंगा बनल्याचे मानले जाते. त्यामुळे पंचगंगेच्या प्रदूषणाचे सर्वेक्षण करताना वरील चारही नद्यांच्या काठच्या गावांचेही सर्वेक्षण करण्यात आले. अशा १७१ गावांपैकी ८९ गावांचे सांडपाणी त्या त्या नदीत मिसळते, असे मानले गेले आणि यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांसाठी शासनाकडे २५२ कोटी ७१ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली. २१ फेब्रुवारी आणि २३ ऑक्टोबर २०२३ असे दोन वेळा हे प्रस्ताव केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडे आणि राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठवण्यात आले. परंतु, सहा महिन्यांपूर्वी हा प्रस्तावच फेटाळण्यात आला आहे.त्यानंतर आता मोठ्या प्रमाणावर सांडपाणी निर्माण करून नदीत सोडणारी १५ गावे निवडण्यात आली असून, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी १०० कोटी रुपयांची मागणी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आता हा प्रस्ताव मंजूर झाला तर मग पावसाळ्यानंतर या कामांना सुरुवात होऊन पुढील वर्षी कामकाज सुरू होऊन २०२६ मध्ये पंचगंगेत सांडपाणी मिसळणे बंद होऊ शकते. परंतु, त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

पंचगंगेचे प्रदूषण करणारी मुख्य गावेपुलाची शिराेली,  चंदूर,  कबनूर,  कोरोची,  मोरेवाडी,  गांधीनगर,  उचगाव,  गडमुडशिंगी,  कळंबे तर्फ ठाणे,  पाचगाव,  नृसिंहवाडी,  तळंदगे,  रूकडी,  वसगडे, रूई. या गावांमध्ये सर्वाधिक सात गावे ही हातकणंगले तालुक्यातील आहेत. सहा गावे करवीर तालुक्यातील असून, एक गाव शिराेळ तालुक्यातील आहे.

प्रदूषणास जबाबदार तालुकानिहाय गावे

  • करवीर ४२
  • राधानगरी १७
  • हातकणंगले १४
  • पन्हाळा ०६
  • शिरोळ ०५
  • गगनबावडा ०४
  • शाहूवाडी ०१
टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण