शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
2
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
3
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
4
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
5
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
6
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
7
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
8
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
9
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
10
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
11
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
12
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
14
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
15
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
16
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
17
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
18
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
19
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
20
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं

विनय कोरे, चंद्रदीप नरके यांचे तालुक्यात वर्चस्व पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 12:27 AM

नितीन भगवान । लोकमत न्यूज नेटवर्क पन्हाळा : पन्हाळा तालुक्यात लोकसभा निवडणुकीचे कोणतेच पडघम वाजत नसल्याने निवडणूक आहे की ...

नितीन भगवान ।लोकमत न्यूज नेटवर्कपन्हाळा : पन्हाळा तालुक्यात लोकसभा निवडणुकीचे कोणतेच पडघम वाजत नसल्याने निवडणूक आहे की नाही असे वातावरण असून, तालुक्यात सर्व काही शांत शांत आहे.गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत पन्हाळा तालुक्यातील पूर्व भागात खासदार राजू शेट्टी यांनी ४० हजारांचे मताधिक्य मिळविलेले होते. यावेळी मात्र ही मते मिळतीलच याची खात्री त्यांना देता येत नाही, तर तालुक्याच्या पश्चिम भागात धनंजय महाडिक विरुद्ध प्रा. संजय मंडलिक असाच गत लोकसभेचा सामना असून, या ठिकाणी गेल्या वेळी धनंजय महाडिक यांनी नऊ हजार मताधिक्य घेतले होते. या ठिकाणीही महाडिक यांना हे मताधिक्य टिकविता येईल का, याबाबत लोकांमध्ये चर्चा आहे.पन्हाळा तालुक्याचे लोकसभा व विधानसभा मतदारसंघासाठी विभाजन झाले असून, पूर्व भागात हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी ६७ गावे गेली असून, या ठिकाणी १ लाख ३५ हजार २४२, तर पश्चिम भागात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ येत असून, यात ६६ गावांचे ७० हजार ४२६ इतके मतदार आहेत.तालुक्याच्या पूर्व भागावर ‘जनसुराज्य’चे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांचे वर्चस्व असून, पश्चिम भागावर आ. चंद्रदीप नरके यांचे वर्चस्व आहे. विनय कोरे आणि राजू शेट्टी यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य सर्वश्रुत असल्याने होणारे मतदान शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्याकडे वळणार की यावेळी मतदार वैयक्तिक निर्णय घेत मतदान करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. बदलत्या राजकीय साठमारीत विनय कोरे यांची मात्र राजकीय कोंडी झाली आहे.पूर्व भागातील शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विविध गटांचे प्राबल्य अधिक आहे. विद्यमान आमदार सत्यजित पाटील (शिवसेना), विनय कोरे (जनसुराज्य), कर्णसिंह गायकवाड व अमरसिंह पाटील (काँग्रेस), मानसिंग गायकवाड व बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी) हे गट प्रमुख आहेत, तर याव्यतिरिक्त शेकाप व अन्य दलित संघटना असे राजकीय समीकरण आहे. जनसुराज्य पक्ष युतीचा सहयोगी पक्ष आहे, तर धैर्यशील माने शिवसेनेचे उमेदवार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षानेही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे मानसिंग गायकवाड, अमर पाटील, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब पाटील हे आघाडी धर्म पाळणार की सोयीची भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.२०१४ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत ४० हजारांवर मताधिक्य घेत खा. राजू शेट्टी यांनी पन्हाळा तालुक्याकडे मागे वळून बघितलेले नाही की सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळलेले नाहीत. दहा वर्षांच्या कालखंडात त्यांनी अपवाद वगळता प्रभावी काम केलेले नाही, अशी चर्चा आहे. या गोष्टींचा विचार करता व प्रमुख नेते विरोधात असल्याने शेट्टी यांची मतदारसंघात सत्त्वपरीक्षा आहे. युतीचे उमेदवार माने हे नवखे असले तरी कै. बाळासाहेब माने व माजी खासदार निवेदिता माने यांच्या पाठबळाच्या शिदोरीवर व अभ्यासू नेतृत्वाच्या बळावर आव्हान निर्माण करू शकतात.या निवडणुकीत खा. शेट्टींसमोर दोनवेळचे मताधिक्य राखण्याचे,तर धैर्यशील माने यांच्यासमोर पूर्वाश्रमीचे आजोबा व आई यांचे खासदारकीचे स्वप्न साकारण्याचे आव्हान असेल. दरम्यान, मंत्री सदाभाऊ खोत यांनाच उमेदवारी मिळणार असे वाटत असतानाच नाट्यमय वळणात धैर्यशील माने यांचा शिवसेना प्रवेश व मिळालेली उमेदवारी डॉ. कोरेंना डोकेदुखी ठरली आहे. परिणामी, कोरेंची राजकीय कोंडी झाल्याचे स्पष्ट होत आहे. पश्चिम भागात आ. चंद्रदीप नरके यांचे प्राबल्य असले तरी गत निवडणुकीत आताचेच उमेदवार होते. यात महाडिक यांना नऊ हजार मताधिक्य मिळाले होते. पाच वर्षे खा. महाडिक पश्चिम पन्हाळ्याच्या भेटीला आले नाहीत की तेथील मतदारांच्या भावना जाणून घेतल्या नाहीत, अशी चर्चा आहे. पन्हाळा तालुक्याचे लोकसभा व विधानसभा मतदारसंघात झालेले विभाजन या कारणाने कोणतेच खासदार, आमदार लक्ष देत नसल्याने तालुक्याचा विकास जैसे थे आहे.