कोल्हापूर : दसरा व दिवाळी उत्सवाच्या निमित्ताने व्यावसायिक व ग्राहकांचा दुहेरी फायदा करून देणाऱ्या ‘लोकमत दीपोत्सव २०१५’च्या दिवाळी सोडतीत विनोद साबळे प्रथम क्रमांकाचे भाग्यवान विजेते ठरले. त्यांना ३२ इंची एलईडी टीव्ही हे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले. योजनेतील बक्षिसांचा दुसरा ‘लकी ड्रॉ’ नागाळा पार्क येथील ‘मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ’ यांच्या पेढीवर सोमवारी उत्साही वातावरणात काढण्यात आला.विविध व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाची स्वतंत्रपणे व किफायतशीर दरात दसरा-दिवाळीदरम्यान जाहिरात करून ग्राहकांना आकर्षित करता यावे, तसेच ग्राहकांचाही सणाचा आनंद बक्षिसांनी द्विगुणित व्हावा यासाठी राजाकाका ई-मॉल आणि मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ प्रस्तुत ‘लोकमत’तर्फे ‘दीपोत्सव २०१५’ या योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेचे रॉयल ब्ल्यू मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, व्ही. काकडे सराफ, अॅक्वॉ क्रिस्टल, सुभाष फोटोज्, वारणा, जसवंत स्वीट्स हे प्रायोजक आहेत.चिपडे सराफ यांच्या नूतन पेढीवर अर्ना देशिंगकर या लहान मुलीच्या हस्ते पहिल्या क्रमांकाचे बक्षीस काढण्यात आले, तर इतर बक्षिसे ‘चिपडे सराफ’चे मुरलीधर चिपडे, ‘सॅमसंग प्लाझा’चे गिरीष शहा, ‘जगदंब गारमेंट’चे मुरली रोहिडा, आर. एल. ज्वेलर्सचे सीईओ चंदन जैन, भूपेंद्र जैन, अॅक्वाकिस्टलचे सुशांत दोशी, ‘कदम बजाज’चे नीलेश कदम, ‘महालक्ष्मी होंडा’चे नितीन मिरजे यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. ( प्रतिनिधी )‘लोकमत’मुळे दिवाळीचा सुखद धक्का बसला आहे. माझ्या ध्यानी- मनी सुध्दा नव्हते मला बक्षीस लागेल ते. मी मूळचा निपाणी येथील रहिवासी असून, कामानिमित्त कोल्हापूरला येतो. लोकमत दीपोत्सवमुळे माझ्याप्रमाणे अनेकांची दिवाळी अविस्मरणीय ठरत असल्याने मी ‘लोकमत’चे आभार मानतो. - विनोद साबळे , विजेते.बक्षीस वितरण सोमवारपासून.... बक्षीस विजेत्यांनी आपली बक्षिसे लकी ड्रॉ कुपन स्थळप्रत व ओळखपत्र दाखवून लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथून सोमवार (दि. १६)पासून १० दिवसांच्या आत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत घेऊन जावीत. उत्तेजनार्थ बक्षीस विजेत्यांची नावे उद्या, बुधवारच्या अंकात प्रसिद्ध करण्यात येतील.
विनोद साबळे प्रथम क्रमांकाचे मानकरी
By admin | Published: November 09, 2015 11:18 PM