कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या अनुषंगाने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या १,५३६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी गुन्हे नोंदवलेल्या १,५०० वाहनधारकांकडून सुमारे १ लाख ७४ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. जिल्ह्यात पोलीस दलाच्यावतीने सोमवारी दिवसभरात ही कारवाई करण्यात आली.विनामास्क फिरणाऱ्या २२६ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ५० हजार ७०० रुपये दंड वसूल केला. तसेच कागदपत्रे नसलेल्या दुचाकी वाहनांवर कारवाई करताना, मोटर व्हेईकल ॲक्टप्रमाणे १,५०० वाहनांवर गुन्हे नोंदवले, तर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ३६ जणांची वाहने काही कालावधीसाठी जप्त करण्यात आली. आस्थापना सुरु करण्याबाबत वेळेचे निर्बंध असताना, त्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७ आस्थापनांवर कारवाई करत त्यांच्याकडून ४,५०० रुपये दंड वसूल केला.दि. ४ ते ३१ मेपर्यंत कारवाई
- विनामास्क : २२,६३३ जणांवर कारवाई - ५०,४५,७६३ रुपये दंड
- मोटर वाहन गुन्हे : ८७,५६९ वाहने - १,५४,०९,९०० रुपये दंड
- वाहने जप्त : ७,५९९ वाहने
- आस्थापना : ४७१ जणांवर कारवाई - ५,८७,८०० रुपये दंड
- मॉर्निंग वॉक : २,४८६ जणांवर कारवाई - ८,८१,९७० रुपये दंड