शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

हिंसक आंदोलन केल्यास गय नाही

By admin | Published: February 01, 2015 12:56 AM

चंद्रकांत पाटील : साखर सहसंचालकांना दिला धीर

 कोल्हापूर : सनदशीर मार्गाने आंदोलन करायला ना नाही; परंतु हिंसक आंदोलन करून सरकारी मालमत्तेचे नुकसान व अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे खपवून घेणार नाही. यापुढे असे प्रकार झाल्यास पोलीस अधीक्षक थेट गुन्हे दाखल करतील; तेव्हा आपल्याला कोणी गुन्हे दाखल करू नका, असा फोन करू नका. सर्व संघटना व राजकीय पक्षांबरोबरच भाजपच्या कार्यकर्त्यांचीही गय करणार नाही, असा इशारा आज, शनिवारी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. ऊसदरप्रश्नी काल, शुक्रवारी शिवसेनेने लक्ष्मीपुरी येथील साखर सहसंचालक कार्यालयात उग्र आंदोलन करून साखर सहसंचालकांना खुर्चीवर बाहेर हाकलले होते. या आंदोलनामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल खचल्याने त्यांनी काम बंद करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर सहकारमंत्री पाटील यांनी या कार्यालयास भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना धीर दिला. सरकार तुमच्या पाठीशी आहे. जिल्हाधिकारी राजाराम माने व पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना या ठिकाणी एकत्रितपणे बोलावून घेऊन आपल्याला धीर द्यायला आलो आहे. इथून पुढे यासंदर्भात प्रशासनाची भूमिका कडक राहील. आपल्या कार्यालयात नेहमी पोलीस बंदोबस्त राहील, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या ठिकाणी वारंवार असे प्रकार घडत आहेत; त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे त्यांनी सांगितले. यावर आंदोलकांनी भेटायला येताना पाच किंवा दहाच लोक त्यांच्या शिष्टमंडळातून येतील, अशा धोरणाची इथून पुढे अंमलबजावणी केली जाईल, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. काल ज्या पद्धतीने आंदोलन झाले ते आम्ही इथून पुढे खपवून घेणार नाही. सनदशीर मार्गाने आंदोलनाला आमचा विरोध नाही; परंतु त्यासाठी असे प्रकार करणे योग्य नाही. जाळपोळ करणे, नाके फोडणे यांतून होणाऱ्या नुकसानीची भरपाई करणे आपल्याला झेपणार नाही, याचे भानही आंदोलकांनी ठेवावे असेही मंत्र्यांनी बजावले. यावेळी प्रादेशिक साखर सहसंचालक वाय. व्ही. सुर्वे, उपसंचालक डी.टी.भापकर, अधीक्षक रमेश भराडे, सर्व विशेष लेखापरीक्षक तसेच जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर, विभागीय सहनिबंधक कार्यालयाचे उपनिबंधक डॉ. महेश कदम, शहर उपनिबंधक रंजन लाखे उपस्थित होते. (प्रतिनिधी) काळ्या फिती लावून काम प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला आंदोलनकर्त्यांकडून वारंवार लक्ष्य केले जाते. त्याच्या निषेधार्थ आज, शनिवारी या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. आगामी काळात असे प्रकार घडले तर थेट सामूहिक रजेवर जाण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे. संघटनेकडून निषेध यावेळी सहकारी विभागातील सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. त्यांनी कालच्या घटनेचा निषेध करून आज, शनिवारी काळ्या फिती बांधून काम केले. कर्मचारी संघटना व राजपत्रित अधिकारी संघटनेने याला पाठिंबा दिला. वैयक्तिक आंदोलने आंदोलन वैयक्तिक पातळीवर यायला लागली आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर याचा परिणाम होत आहे. कार्यालयातील जागा अपुरी असल्याने पर्यायी जागेचा शोध सुरू करा, अशा सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या.