शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

राधानगरी, वारणा धरणांतून विसर्ग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 6:10 PM

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस झाल्याने राधानगरी व वारणा धरणांतून सायंकाळी विसर्ग वाढविण्यात आला.

ठळक मुद्देराधानगरी, वारणा धरणांतून विसर्ग वाढलाजिल्ह्यात धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस झाल्याने राधानगरी व वारणा धरणांतून सायंकाळी विसर्ग वाढविण्यात आला. सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २५.०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, पंचगंगेची पातळी ३६.१० फुटांपर्यंत आली आहे.शुक्रवारी सकाळपासून गगनबावडा, आजरा, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांत पावसाची रिपरिप राहिली. करवीर, कागल, कोल्हापूर शहर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यात एक-दोन सरी वगळता उघडीप होती. गगनबावड्यासह धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे ३,५ व ६ क्रमांकाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले सायंकाळी झाल्याने एकूण विसर्ग  ५६८४ क्युसेकने विसर्ग वाढला आहे.

सध्या त्यातून प्रतिसेकंद ५६८४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून जवळपासून दुप्पट विसर्ग केला असून ११ हजार ९७८ घनफूट पाणी सोडण्यात येत आहे. दूधगंगेतून मात्र १८०० घनफुटांचा विसर्ग सुरू आहे.पावसाची उघडझाप असल्याने नद्यांची पाणीपातळी संथगतीने उतरू लागली आहे. पंचगंगेची पातळी शुक्रवारी सकाळी ३८.३ फूट होती, ती सायंकाळी सात वाजता ३६.७ फुटांपर्यंत खाली आली होती. अद्याप ३३ बंधारे पाण्याखाली असून या मार्गावरील वाहतूक विस्कळीत आहे.

चार राज्य व १६ प्रमुख जिल्हा मार्गांवरील वाहतूक पुराच्या पाण्यामुळे ठप्प आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ९७ मिलिमीटर झाला; तर १४ खासगी मालमत्तांची पडझड होऊन तीन लाख सात हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये-राधानगरी (८.३५), तुळशी (३.३५), वारणा (३१.९९), दूधगंगा (२३.६६), कासारी (२.४७), कडवी (२.५२), कुंभी (२.५०), पाटगाव (३.७२).

धरणामधून सुरू विसर्ग 

तुळशी- २५२ क्युसेक, वारणा- ११९७८ क्युसेक, दुधगंगा- १८०० क्युसेक, कासारी- २५० क्युसेक, कडवी - ८६५ क्युसेक,कुंभी - ३५० क्युसेक, पाटगाव - २८१८ क्युसेक, चित्री - ११७३ क्युसेक, जंगमहट्टि-  ३३५ क्युसेक, घटप्रभा -१६७३ क्युसेक, जांबरे-११९८  क्युसेक, कोदे- ६६३  क्युसेक बंधारा पाणी पातळी  

राजाराम- ३६ फूट १०, राजापूर - ४७  फुट ६, नृसिंहवाडी -५९  फुट ६, शिरोळ  - ५९ फुट ६, इचलकरंजी -६५ फुट ९ इंच, तेरवाड - ५९ फुट ३ इंच,

कोयना पाणी पातळी- ६५६.६४१ मी, सध्या ९३.४५ टीएमसी (८८. ७९ टक्के) जावक विसर्ग २५०००अलमट्टि पाणी पातळी सध्या  ५१८.१२ मी, ९१.४६४ टीएमसी आवक २७४०२८ व  जावक विसर्ग २५१९२२

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर