कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला विष्णूने आपली पत्नी लक्ष्मीच्या पूर्नप्राप्तीसाठी अंबाबाईच्या मुर्तीसमोर तपश्चर्या केली या पूरात पूजा बांधण्यात आली. अगस्ती वंदना असे या पूजेचे नाव असून ग्रंथोल्लेखानुसार कोल्हापूरची अंबाबाई ही विष्णूची आई होते. अज्ञानामुळे कोल्हापूरची अंबाबाई म्हणजेच तिरुपती बालाजीची पत्नी असल्याचा चुकीचा समज भाविकांमध्ये झाला आहे. वास्तविक ही देवी विष्णूची पत्नी नाही तर आई आहे. भृगू ऋषींनी विष्णूच्या छातीवर लाथ मारल्यानंतर अपमानित झालेली लक्ष्मी करवीरात कपिलमुनींच्या आश्रमात वास्तव्याला आली. तिच्या शोधार्थ करवीरात आलेल्या विष्णूला अगस्तीमुनींनी आराधना केलेली अंबाबाईची मुर्ती दिसली. येथे विष्णूने लक्ष्मीच्या पूर्नप्राप्तीसाठी अंबाबाईच्या मुर्तीसमोर दहा वर्षे तपश्चर्या केली. अंबाबाईने विष्णूला आकाशवाणीने तु तिरुपती येथील सुवर्णमुखरी नदितीरी तपश्चर्या कर तेथेच तुला लक्ष्मी भेटेल असे सांगितले. त्यानुसार विष्णूने तिरुपती येथे पून्हा दहा वर्षे तपश्चर्या केली. त्यानंतर विष्णू आणि लक्ष्मीचे पूर्नमिलन झाले. आणि विष्णूने स्वत: लक्ष्मीला ही घटना सांगितली, असा उल्लेख तिरूमला युनिव्हर्सि टीने प्रकाशित केलेल्या वेंकटाचल महात्म्यात आहे, त्यानुसार अंबाबाईची आजची पूजा बांधण्यात आली. पूजेची रचना सागर मुनिश्वर व रवी माईनकर यांनी असून संकल्पना उमाकांत राणिंगा व प्रसन्ना मालेकर यांची आहे. सत्यजीत निगवेकर यांनी मुर्ती घडवली असून त्यासाठी चित्रकार प्रशांत इंचनाळकर यांनी सहाय्य केले.
विष्णूने केली अंबाबाईची आराधना
By admin | Published: October 01, 2014 5:39 PM