म्हालसवडे : ‘लोकमत’च्या आवाहनास प्रतिसाद देत व डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत डॉ. डी. वाय. पाटील गु्रपच्यावतीने गर्जन (ता. करवीर) शाळेस रविवारी एक लाखाचे शालेय साहित्य देण्यात आले. गु्रपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या हस्ते शाळा व्यवस्थापन समितीकडे साहित्य सुपूर्द करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच बायनाबाई कांबळे होत्या.डॉ. गुप्ता म्हणाले, गर्जन शाळेला भौतिक सुविधांसाठी ‘लोकमत’ने दानशूरांना मदतीचे आवाहन केले होते. डॉ. संजय डी. पाटील यांनी शाळेला शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार साहित्य शाळेस देण्यात आले असून आगामी काळातही शाळेच्या मागे उभे राहून जिल्ह्यातील आदर्श शाळा बनवू. शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीने शिक्षणाचा दर्जा अधिक चांगला करण्यासाठी ई-लर्निंगची सुरुवात करावी, संगणकासाठी लागणाºया इंटरनेटचा खर्च डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.करवीरचे उपसभापती विजय भोसले म्हणाले, शासनाचे शिक्षणाबाबतचे धोरण निराशाजनक आहे. शाळेच्या दुरुस्तीसह भौतिक सुविधांसाठी निधीची कमतरता असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुख्याध्यापक मारुती लांबोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना लांबोरे म्हणाले, ‘लोकमत’मुळे शाळेकडे मदतीचा ओढा वाढत आहे. अशीच मदत होत राहिली तर थोड्याच दिवसात शाळेचा चेहरा-मोहरा बदलेला दिसेल. प्राचार्य ए. एन. जाधव, अनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य शिल्पा पाटील, उत्तम चव्हाण, गोविंद सुतार, नारायण पाटील, संजय सुतार, सर्जेराव कांबळे आदी उपस्थित होते. दरम्यान, डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला.लोकप्रतिनिधीहीदेणार निधीचाफोडी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सुतार यांनी दोन हजार रु.ची पुस्तके शाळेला भेट दिली. जि.प. सदस्य शिल्पा पाटील व करवीरचे उपसभापती विजय भोसले यांनी आपल्या निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये शाळेच्या इमारतीसाठी देण्याचे आश्वासन दिले आहे, तर उद्योजक सुरेश हुजरे, मीना संकेश्वरे (हिरवडे), राहुल पाटील (जैताळ), म. द. पाटील (म्हाळुंगे) यांनीही आर्थिक मदत जाहीर केली आहे.
‘डी.वाय.’ ग्रुपची गर्जन शाळेस लाखाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 1:03 AM