इचलकरंजी : येथील श्री पंचगंगा वरदविनायक बोट क्लबला पुणे येथील जनरल सचिव संजय वळवी व राष्ट्रीय मार्गदर्शक गणेश मोरे यांनी भेट दिली. त्यांनी क्लबच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. या क्लबला २०२२ मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय सबज्युनिअर स्पर्धा आयोजनाची जबाबदारी दिली.
भारती हायस्कूलचे यश
इचलकरंजी : ॲबॅकस ऑनलाईन स्पर्धेत येथील भारती हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी यश संपादन केले. यामध्ये योगिता साखरे (प्रथम), समृद्धी मासोळे (पाचवी), तर गौरी मोरे व सुजाता मोरे (चतुर्थ) क्रमांक पटकावला. विद्यार्थिनींना मुख्याध्यापक शिवाजी पाटील, महादेवी यड्रावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
भित्तीपत्रिकेचे अनावरण
इचलकरंजी : एएससी महाविद्यालयात गणित विभागाच्या भित्तीपत्रिकेचे अनावरण प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांनी केले. ‘गणित विषयाची उपयोगिता’ या विषयावर विद्यार्थ्यांनी १६ संशोधनात्मक पोस्टर तयार केले. यावेळी प्रा. एस. पी. थोरात, प्रा. डी. जे. मुंगारे, डॉ. पी. पी.पुजारी, डॉ. व्ही. ए. पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.