घाटगे यांनी सकाळच्या सत्रात भेट दिली. या सेंटरला कोणत्याही वैद्यकीय सुविधांची कमतरता भासल्यास त्याची आपल्या परीने पूर्तता करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले, तर दुपारी मंडलिक यांनी भेट देत हायरिस्कमध्ये योगदान देत असणाऱ्या तरुणांचे कौतुक केले. यावेळी तुकाराम सावंत, बाबूराव हिरुगडे, चंद्रशेखर सावंत, आर. आर. सावंत, सागर पाटील, दत्तात्रय लंबे, सुनील बोंगार्डे, बाळासाहेब मेटकर, विनायक जगदाळे, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.
बेनिक्रेच्या महिलेने घेतले बानगेत उपचार
गावातील नागरिकांसाठी हे सेंटर उभारले असले तरी मानवतेच्या दृष्टीने येथील संयोजकांनी बेनिक्रेतील महिलेला उपचारासाठी दाखल करून घेतले. मुरगूडमध्ये त्यांना बेड न मिळाल्याने त्यांनी बानगेत संपर्क केला होता. सारिका विक्रम हासबे (वय४०) असे या कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी परतलेल्या महिलेचे नाव आहे.