शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

कोल्हापुरातील १३ देवतांचे एका ठिकाणी दर्शन-नवऊर्जा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:42 AM

कोल्हापूर : भव्य प्राचीन मंदिराचे प्रवेशद्वार, दोन्ही बाजूंना उभ्या असणाºया भव्य हत्तींच्या मूर्ती, दीपमाळ, लक्षवेधी मंगल कलश, अंबाबाईच्या कपाळावरील मळवट आणि भव्य द्वारातून आत प्रवेश केल्यावर

ठळक मुद्दे नितीन देसाई यांची कल्पना, चंद्रकांंतदादा पाटील यांचा पुढाकार;आजपासून जिल्ह्यात रथ फिरणाररोज ९० किलोमीटरचा प्रवास करीत हा रथ या नवऊर्जा उत्सवाची माहिती सर्वत्र देणार

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : भव्य प्राचीन मंदिराचे प्रवेशद्वार, दोन्ही बाजूंना उभ्या असणाºया भव्य हत्तींच्या मूर्ती, दीपमाळ, लक्षवेधी मंगल कलश, अंबाबाईच्या कपाळावरील मळवट आणि भव्य द्वारातून आत प्रवेश केल्यावर कोल्हापुरातील १३ देवतांचे एका ठिकाणी होणारे दर्शन... हे वर्णन कोणत्या चित्रपटातील नसून, कोल्हापुरातील जरगनगरकडे जाणाºया निर्माण चौकामध्ये उभारलेल्या भव्य कलाकृतीचे आहे.

विख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून साकारणाºया ‘नवऊर्जा उत्सव २०१७’ या विशेष नवरात्रौत्सव कार्यक्रमाचे २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम होत असून, त्यांनीच शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमिपूजनावेळी देसाई यांच्यातील कलात्मक ताकदीची कल्पना आम्हांला आली होती. अंबाबाईची सेवा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. आम्ही त्यांना सहकार्य करण्याचे ठरविले आणि ४५ ट्रक साहित्य घेऊन हा माणूस कोल्हापुरात आला आहे. कोल्हापुरातील १३ देवतांचे एका ठिकाणी भाविकांना दर्शन या ठिकाणी होणार आहे. या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम आणि रोज संध्याकाळी पाच ते आठ या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. या निमित्ताने जिल्हाभर फिरणाºया रथाचेही उद्घाटन यावेळी मंत्री पाटील व त्यांच्या पत्नी अंजली यांनी केले.

नितीन देसाई म्हणाले, मी अंबाबाईचा भक्त आहे. माझी सेवा करण्याची इच्छा होती. माझ्या सर्व कलाकृतींच्या सादरीकरणापूर्वी मी अंबाबाईच्या दर्शनासाठी आलो आहे. बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर अशा दिग्गजांची ही नगरी आहे. सर्व देवतांचे नवरात्रामध्ये एकत्र दर्शन व्हावे, ही संकल्पना दादांना आवडलीे. या ठिकाणी किशोर सुतार यांनी साकारलेली भारतमाताही पे्ररणा देणारी आहे. सागर बगाडे यांचा बॅलेही साकारण्यात येणार आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेत येथे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.पत्रकार परिषदेला कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे, अनंत खासबारदार, शिरीष खांडेकर, चारूदत्त जोशी, सुजय पित्रे, मिलिंद अष्टेकर, पारस ओसवाल उपस्थित होते.देवी होणार प्रकटयासाठी ३२ हजार चौरस फुटांचा मंडप उभारण्यात आला आहे. अशा कार्यक्रमासाठी मी पहिल्यांदाच एवढा मंडप उभारत असल्याचे नितीन देसाई यांनी सांगितले. यातील देवी या भूगर्भातून हायड्रॉलिक यंत्रणेच्या माध्यमातून भाविकांसमोर प्रकट होणार आहेत.या असतील देवीएकवीरा, मुक्तांबिका, पद्मावती, फिरंगाई, कमलजा, त्र्यंबोली, अंबाबाई, कात्यायनी, महाकाली, अनुगामिनी, गजलक्ष्मी, श्रीलक्ष्मी, तुळजाभवानी अशा १३ देवतांचे दर्शन या ठिकाणी होणार आहे. एका बाजूने जाऊन दुसºया बाजूने बाहेर येता येणार आहे. करवीरमाहात्म्य ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या या १३ देवतांबाबत यावेळी अ‍ॅड. प्रसन्न मालेकर यांनी माहिती दिली.हेमामालिनी रद्द, माधुरीसाठी प्रयत्नप्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी या कार्यक्रमासाठी येण्याचे निश्चित झाले होते. मात्र, सुरतच्या कार्यक्रमामुळे त्यांचे येणे रद्द झाले. आता माधुरी दीक्षित-नेने यांच्यापासून अन्य अभिनेत्रींशी संपर्क साधून त्यांनी देवीसमोर सेवा सादर करावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार २६ सप्टेंबर रोजी सुरभी हांडे (म्हाळसा भूमिकेतील) या येणार आहेत.आजपासून रथ गावोगावीया भव्य उपक्रमाची माहिती देण्यासाठी अंबाबाईची प्रतिकृती असलेला रथ तयार करण्यात आला आहे. हा रथ आता येत्या आठवड्याभरात संपूर्ण जिल्ह्यात फिरणार आहे. रोज ९० किलोमीटरचा प्रवास करीत हा रथ या नवऊर्जा उत्सवाची माहिती सर्वत्र देणार आहे.