इरफान मुजावर/पट्टणकोडोली : महाराष्ट्रासह अनेक राज्यांत प्रसिद्ध असणाऱ्या पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस रविवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या निनादात 'श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं'च्या गजरात फरांडेबाबांनी ऐतिहासिक 'हेडाम' सोहळ्याचे दर्शन घडविले. यावेळी प्रसिद्ध भाकणूकह’ झाली.खेलोबा नाना ऊर्फ राजाभाऊ वाघमोडे (फरांडेबाबा) महाराज 'हेडाम' खेळत मंदिरात आले. त्यांनी देवाचे दर्शन घेतले. त्यांनी 'श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं' असा गजर करीत भाकणूक केली. राजकारणात गोंधळ होईल. रोहिणीचा पाऊस, मृगाचा पेरा. तांबडं धान्य व रसभांडे कडक होईल. माझी सेवा करेल त्यावर कांबळ धरेन. सात दिवासांत पाऊस पडेल, अशी भाकणूक फरांडेबाबांनी केली.
पट्टणकोडोलीच्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस उत्साहात प्रारंभ; राजकारणात गोंधळ होण्याची भाकणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 7:12 PM