शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीसमोर मताधिक्य राखण्याचे आव्हान, मविआची 'या' 11 मतदारसंघात काय होती स्थिती?
2
"त्या उमेदवाराला पराभूत करू"; अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात सोमय्यांनी थोपटले दंड
3
फूट पाडायला हा माणूस तरबेज, गोड बोलणाऱ्यांना...; पाटलांच्या मतदारसंघात अजित पवारांची फटकेबाजी 
4
स्टुडिओबाहेर जमिनीवर झोपायचा; १२ वर्षांच्या संघर्षानंतर 'या' अभिनेत्याला मिळाली ओळख
5
नांदगावात भुजबळांची अनोखी खेळी; निवडणुकीत सुहास कांदेविरोधात सुहास कांदे लढणार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बंडखोर उमेदवारांमुळे महायुती अडचणीत;'या' विधानसभा मतदारसंघात टेन्शन वाढलं
7
महायुतीच्या जागावाटपाचा फायनल आकडा समोर, भाजपा १४८, शिंदे गट आणि अजित पवार गटाला किती जागा? पाहा
8
सरकारला विचारल्यावर तुझा जन्म झालाय का? IAS अधिकाऱ्याने नोकरी मागणाऱ्यांना सुनावले
9
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ८७ शिलेदार; वाचा संपूर्ण यादी, एकाच क्लिकमध्ये
10
राजस्थान, जम्मू काश्मीरमध्ये बसचे दोन मोठे अपघात; 12 जणांचा मृत्यू
11
सरकारचा मोठा निर्णय, कर्करोगाच्या उपचारासाठी वापरली जाणारी 3 महत्वाची औषधं स्वस्त! अशी आहेत नावं
12
नवा स्कॅम! यूट्यूब Video लाईक करुन गमावले तब्बल ५६ लाख; 'ही' एक चूक पडली महागात
13
IND vs NZ : मुंबई टेस्टसाठी Harshit Rana ची वाइल्ड कार्ड एन्ट्री! प्लेइंग इलेव्हनमध्येही मिळू शकते संधी
14
"या वयात इतके खोटं बोलायचे नसतं"; शरद पवारांच्या आरोपांना फडणवीसांचे प्रत्युत्तर
15
Maharashtra Election 2024: दोन ठिकाणी 'राष्ट्रवादी'तच सामना; काका की पुतण्या, कोण ठरणार भारी? 
16
नवाब मलिकांनी अखेरच्या पाच मिनिटांत संपवला सस्पेन्स! भाजपची होणार कोंडी?
17
...अन् नवी कोरी स्कोडा आबांच्या घरी पाठवली; अजितदादा अन् आबांमध्ये लागली होती पैज
18
“महाभ्रष्ट भाजपायुती सरकारला सत्तेतून खाली खेचणे हेच मविआचे ध्येय”; नाना पटोलेंची टीका
19
बालेकिल्ला राखण्याचे महायुतीपुढे आव्हान, काँग्रेसचा दुणावलेला आत्मविश्वास!
20
PM मोदींची कोट्यवधी वृद्धांना दिवाळी भेट; दरवर्षी 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार...

तब्बल ४६ वर्षानंतर पहिल्यांदाच विठ्ठल मंदिर पाण्याबाहेर, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2023 7:53 AM

'बेळगाव'च्या हिडकल जलाशयातील विठ्ठल मंदिर; ९५ वर्षानंतरही मातीची मूर्ती सुस्थितीत!

- राम मगदूम

गडहिंग्लज : हिडकल जलाशयाच्या पाण्याखाली हुन्नुरचे हेमांडपंथी श्री विठ्ठल मंदिर व गाभाऱ्यातील मातीची मूर्ती तब्बल ४६ वर्षानंतरही सुस्थितीत आहे. मान्सूनचा पाऊस लांबल्यामुळे ५१ टीएमसी क्षमतेच्या जलाशयातील पाण्याने यावर्षी तळ गाठल्याने तब्बल चार दशकानंतर पहिल्यांदाच हे मंदिर पूर्णत: पाण्याबाहेर आले आहे. त्यामुळे बेळगांव जिल्ह्यासह सीमाभागातील भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.

१९७७ मध्ये जलाशयाचे काम पूर्ण झाले. बुडीत क्षेत्रातील विस्थापित २४ खेड्यांपैकी हुन्नूर ग्रामस्थांचे हे ग्रामदैवत आहे. ३० बाय ३० आकाराचे हे मंदिर काळ्या पाषाणात स्थानिक कारागीरांनी चुनखडीत बांधले आहे. मंदिराचे खांब, चौकटी, खिडक्या, छत, तसेच सुमारे ४० फूट उंचीचे शिखरही दगडी आहे. १९७३ मध्ये जलाशयामुळे गाव विस्थापित झाल्यानंतर शासनाने 'सिमेंट काँक्रीट'मध्ये विठ्ठलाचे नवे मंदिर बांधून दिले. परंतु, ते पाडून कोट्यवधी रूपये खर्च करून ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जुन्या मंदिराची प्रतिकृती असणारे भव्य मंदिर पुर्नवसित गावात बांधले आहे.

सुमारे ३०० उंबऱ्याच्या गावातील जवळपास अडीचशेह कुटुंबे धनगर समाजाची आहेत. त्यांच्याकडेच मंदिराची पूजा आहे. उर्वरित लिंगायत, ब्राम्हण, बेडर, मुस्लिम, हरिजन कुटुंबे मंदिराचे हक्कदार आहेत.जलाशयातील पाणी ओसरून मंदिरात जाण्यास वाट झाली तरच जुन्या मंदिरात अन्यथा जलाशयाच्या काठावरूनच पूजा-अर्चा केली जाते. नव्या मंदिरात नित्यनियमाने दैनंदिन पूजा-अर्चा होते. मंदिराची व्यवस्थापन समिती / ट्रस्ट नाही. संपूर्ण ग्रामस्थच मंदिराचे व्यवस्थापन करतात. मंदिराचे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. जुने आणि नवीन दोन्ही मंदिरे लोकवर्गणीतूनच बांधण्यात आले आहे.

अख्यायिका :निवडुंगाच्या झुडपातील वारूळात विठ्ठलचा वास होता. त्याठिकाणी येताच पाटलाच्या गाईला आपोआप पुन्हा फुटायचा. गावातील एका माणसाच्या स्वप्नात  येवून देवाने सांगितले की, ‘मी विठ्ठल आहे...माझी पूजा करा’. त्यामुळे गावकऱ्यांनी वारूळाची पूजा करून त्याचठिकाणी मंदिर बांधण्यात आले.

मूर्ती :विठ्ठल मंदिर असले तरी याठिकाणी विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती नाही.  वर्षानुवर्षाच्या ‘चंद्र’लेपणामुळे वारूळावर शेंदूरसदृश्य थर तयार झाला आहे. ४६ वर्षे पाण्यात राहूनही हे वारूळ विरघळलेले नाही, त्यावरील घोंगड्याची घडीही मोडलेली नाही.

यात्रा : दरवर्षी दसरा व गुढीपाडव्याला यात्रा भरते. त्याशिवाय रविवारी व अमावस्येला दर्शनासाठी भाविक गर्दी करतात. यात्रेत जोतिबाच्या यात्रेप्रमाणे येथेही सासनकाठ्या नाचवतात. पालखीत पितळेच्या ३ मूर्ती आहेत. त्या ‘ब्रम्हा, विष्णू, महेश’च्या आहेत,असे ग्रामस्थ सांगतात.

८ हजारात मंदिर!- १९२८ मध्ये केवळ ८ हजारात शिंगाडी मायाप्पा पुजारी, बाळाप्पा रंगाप्पा गडकरी, गुरूनाथ संभाजी कुलकर्णी यांच्या पुढाकाराने हे मंदिर बांधण्यात आले आहे.- जुन्या मंदिराच्या आवारातील घोड्याचा तबेला, शाळा व स्वयंपाकाची खोली पाण्यामुळे पडली आहे. परंतु, मंदिराचे भव्य दगडी प्रवेशद्वार व सनई, चौघड्याची दुमजली खोली अद्याप शाबूत आहे.- भाविक देवाला केवळ केळीचा नैवद्य ठेवतात. कुणी पैसे ठेवल्यास त्यातील फक्त ५ रूपये पुजारी घेतात, उर्वरित रक्कम देवस्थानच्या खर्चासाठी वापरले जाते.- पूर्वी यात्रा, दर रविवारी व अमावस्येला अन्नदासोह (महाप्रसाद) केला जात होता. परंतु, भाविकांची संख्या वाढल्यामुळे सध्या गावातील घराघरातून येणारी आंबील प्रसाद म्हणून वाटली जाते.- जलाशयातील मंदिराच्या आजूबाजूला श्री बसवाण्णा, श्री. लक्ष्मी, श्री दुर्गामाता यांची छोटी मंदिरे आहेत. यापैकी बसवाण्णा मंदिर अद्याप निम्मे पाण्यातच आहे.

हे मंदिर कुठे आहे ?पुणे-बंगळुरू महामार्गावर संकेश्वर-बेळगांव दरम्यान बेळगांवपासून ४० तर संकेश्वरपासून २७ किलोमीटर अंतरावर हुन्नूर येथे आहे. 

टॅग्स :Templeमंदिरbelgaonबेळगाव