कोल्हापूर : विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीच्या महाराष्ट्र प्रांत शाखेमार्फत रविवार, दि. ५ सप्टेंबर २०२१ रोजी विवेक चेतना २०२१, वेध युवा मनांचा, ध्यास आत्मनिर्भरतेचा, साद युवाशक्तीला या उपक्रमात डॉ. समीर पारेख यांच्याशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधण्यात येणार आहे.
या उपक्रमातील ‘जीवनकौशल्ये-संवाद आणि सहानुभूती’ या विषयावरील पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात निर्माण उत्तम चारित्र्याचे या विषयांतर्गत डॉ. समीर पारेख हे रविवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ११.३० या वेळेत होणाऱ्या परिसंवादात संवाद साधणार आहेत. डॉ. पारेख हे सीए आहेत.
१८ ते ४० वयोगटातील युवकांसाठी व्यक्तिमत्त्व विकास आणि त्यांच्यातील क्षमता काैशल्याचे वर्धन व्याख्यान आणि परिसंवादाच्या माध्यमातून हा नि:शुल्क उपक्रम सुरू आहे. डिसेंबरअखेर सुरू राहणाऱ्या या दुसऱ्या टप्प्यात या विवेक चेतना उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नवीन सदस्यांसाठी नावनोंदणी सुरू आहे. यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करणाऱ्यांना सकाळी ९.४५ वाजता ऑनलाईन लिंक उपलब्ध होईल, अशी माहिती कोल्हापूर केंद्राचे अरुण कुलकर्णी यांनी दिली आहे. यासाठी १०१६, ए वॉर्ड, औक्षण, भोईटेनगर, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.
(संदीप आडनाईक)