कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आणि महावीर महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेला ३८ वा कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवात दमदारपणे कलाप्रकारांचे सादरीकरण करीत स्पर्धेत विवेकानंद कॉलेजच्या संघाने वर्चस्व राखले. या संघाने आठ स्पर्धांमध्ये बाजी मारली. त्यापाठोपाठ देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज आॅफ कॉमर्स, आजरा आणि दूधसाखर महाविद्यालयाने यश मिळविले.कलाप्रकारनिहाय विजेते (प्रथम, द्वितीय, तृतीय) : मराठी वक्तृत्व : डी. आर. माने महाविद्यालय (कागल), दूधसाखर महाविद्यालय (बिद्री), राजाराम महाविद्यालय. हिंदी वक्तृत्व : जयसिंगपूर कॉलेज, गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय, राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय (रुकडी). इंग्रजी वक्तृत्व : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (पेठवडगाव), दूधसाखर महाविद्यालय, सर्व अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ. वादविवाद : न्यू कॉलेज, विवेकानंद कॉलेज, दूधसाखर महाविद्यालय. लोककला : दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स अॅँड कॉमर्स कॉलेज (इचलकरंजी), सदाशिव मंडलिक महाविद्यालय (मुरगूड), शरद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (यड्राव).
लोकनृत्य : आजरा महाविद्यालय, श्री शिवशाहू महाविद्यालय (सरुड), विवेकानंद कॉलेज. लोक वाद्यवृंद : विवेकानंद कॉलेज, आजरा महाविद्यालय, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज आॅफ कॉमर्स. समूहगीत : सर्व अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, विवेकानंद कॉलेज, कॉमर्स कॉलेज. नकला : यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय (वारणानगर), आजरा महाविद्यालय, विवेकानंद कॉलेज. एकांकिका : शरद इन्स्टिट्यूट, विवेकानंद कॉलेज, दत्ताजीराव कदम कॉलेज.
लघुनाटिका : विवेकानंद कॉलेज, भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, न्यू कॉलेज. पथनाट्य : डॉ. घाळी कॉलेज (गडहिंग्लज), भोगावती महाविद्यालय (कुरुकली), कॉमर्स कॉलेज. मूकनाट्य : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, श्री विजयसिंह यादव कला व विज्ञान महाविद्यालय (पेठवडगाव), श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय (इचलकरंजी).
सुगम गायन : राजाराम महाविद्यालय, विवेकानंद कॉलेज, आजरा महाविद्यालय. हा निकाल जिल्हास्तरीय महोत्सवाचे संयोजन करणाऱ्या महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे यांनी जाहीर केला. या विजेत्यांची सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात बुधवार (दि. ३१) पासून होणाऱ्यां मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी निवड झाली आहे.