शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

आवाजाची ओळख, बोलण्याचा आत्मविश्वास वाढविणारी कार्यशाळा-आज समारोप : निनाद काळे यांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 12:38 AM

कोल्हापूर : आवाजाची ओळख करून देण्यासह बोलण्याचा आत्मविश्वास वाढविणारी कार्यशाळा गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सभागृहात सुरू आहे.

कोल्हापूर : आवाजाची ओळख करून देण्यासह बोलण्याचा आत्मविश्वास वाढविणारी कार्यशाळा गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सभागृहात सुरू आहे. आवाज अभिनेता निनाद काळे मार्गदर्शनाखालील या कार्यशाळेत दहा ते सत्तर वर्षांपर्यंतचे आबालवृद्ध आवाजाबाबतचे धडे गिरवित आहेत. या कार्यशाळेचा समारोप आज, मंगळवारी सायंकाळी सात वाजता ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

याबाबत निनाद काळे यांनी सांगितले, मोबाईल क्रांतीमुळे माणसे ‘लँडलाईन’ आणि दूरध्वनी ‘मोबाईल’ झाले. आज एकमेकांशी बोलायचे तर टॉकटाईम रिचार्ज करावा लागतो. अशा पद्धतीने आपले बोलणे महाग होत आहे. अर्थात, आधीच्या काळात सगळचे आलबेल होते असे नाही, तर मोठ्यांनी सांगितलेले लहानांनी ऐकायचे हीच परंपरा होती. त्यामुळे आपल्याकडे कुटुंबात, शाळा-कॉलेज, धर्मात बोलण्याचा संस्कारच केला जात नाही. त्यामुळे पालक आपल्या मुलांशी, शिक्षक-प्राध्यापक विद्यार्थ्यांशी, एकूणच समाजात जसे बोलायला हवे तसे बोलले जात नाही. त्यामुळे आज प्रत्येक नातेसंबंधात तणाव वाढत आहे. मुलांचे बालपण हरवत आहे. त्यासह अभिनय, सूत्रसंचालन, डबिंग, गायन, शिक्षक, प्राध्यापक, वकील, मार्केटिंग, आदी क्षेत्रात करिअर करण्यासाठी बोलण्याचा पाया भक्कम असावा लागतो, पण याकडे आजतागायत कुणी फारसे गंभीर नाही. त्यामुळे मी आणि संगीता राठोड यांनी संबंधित गरज ओळखून वय वर्षे दहा ते सत्तर अशा सर्वांसाठी ही आवाजाची कार्यशाळा सुरू केली. दर महिन्याला दोन अशा पद्धतीने या कार्यशाळेचे राज्यभर आयोजन केले जाते.आवाजासह विचारांची कार्यशाळाचेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेतील या कार्यशाळेत आवाजाची ओळख, श्वासाचे, जिभेचे अनेक व्यायाम प्रकार, आवाजाचे चढ-उतार, शब्दोच्चार यावर भर देत बोलताना उभे कसे राहायचे, हातवारे कसे करायचे, देहबोली कशी असावी. एखादा विषय समजून घेऊन मगच स्वयंस्फूर्तीने कसे बोलायचे, याचे मार्गदर्शन संपूर्ण प्रात्यक्षिक पद्धतीने केले जाते. ज्यामुळे कार्यशाळेतील प्रत्येक व्यक्तीला सर्वांसमोर बोलण्याचा आत्मविश्वास केवळ पाच ते सहा दिवसांत येतो. आधी स्वत:शी मग इतरांशी बोलण्याचे भान येते. आवाजासह ही विचारांची कार्यशाळा असल्याचे निनाद काळे यांनी सांगितले.कोल्हापुरातील चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सभागृहातील ‘आवाजाची कार्यशाळा’मध्ये निनाद काळे यांनी मार्गदर्शन केले.