गारगोटीत नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कारगारगोटी : आम्ही मंजूर केलेल्या विकासकामांचे नारळ वाढवून स्वत:ची टिमकी वाजविणाºयांना ग्रामपंचायत निवडणुकीत गारगोटीच्या मतदारांनी योग्य जागा दाखविली आहे. आता तरी त्यांनी वास्तवात यावे, अशी घणाघाती टीका आमदार प्रकाश आबिटकर यांचा नामोल्लेख टाळून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.गारगोटी येथील इंजुबाई सभागृहात शनिवारी झालेल्या भाजप बुथप्रमुख, कार्यकर्त्यांचा मेळावा आणि नवनिर्वाचित सरपंच, सदस्य यांच्या सत्कार समारंभ संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके होते. प्रमूख पाहुणे म्हणून आमदार सुरेश हाळवणकर हे होते.यावेळी आमदार हाळवणकर म्हणाले, राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखाली गारगोटी ग्रा.पं.च्या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले आहे. गावाच्या विकासासाठी शासनाकडून प्रचंड निधी खेचून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी बूथप्रमुखांनी व कार्यकर्त्यांनी भाजपचा विचार जनतेपर्यंत पोहोचवावा.राहुल देसाई म्हणाले, गारगोटी ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय ही या विभागातील भाजपच्या पर्वाची सुरुवात झाली असून, लवकरच होणाºया विधानसभा, लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचा आमदार आणि खासदार होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचे सरकार मिळणार आहे. तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले.यावेळी गारगोटीचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच संदेश भोपळे व ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास बाबा देसाई, प्रवीण सावंत, अलकेश कांदळकर, अशोक चराटी, बाळासाहेब नवणे, प्रा. हिंदुराव पाटील, संतोष पाटील, देवराज बारदेसकर, जगदीश लिंग्रज, प्रवीण नलवडे, संभाजी आरडे, नामदेव चौगले, सुनील तेली, रणजित आडके, एम. डी. पाटील, दगडू राऊळ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितहोते. दीपक शिरगावकर यांनी आभार, तर बजरंग कुरळे यांनी सूत्रसंचालन केले.गारगोटी येथील सत्कार समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नाथाजी पाटील, बाबा देसाई, आमदार सुरेश हाळवणकर, राहुल देसाई, अलकेश कांदळकर, प्रवीण नलवडे, देवराज बारदेस्कर, हिंदुराव शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते.
टिमकी वाजविणाऱ्यांना मतदारांनी जागा दाखविली : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 12:55 AM