कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील अधिसभा, विद्या परिषद, आदी अधिकार मंडळांसाठी दिवाळीनंतर मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणे, त्यांची छाननी, माघारीबाबतच्या प्रक्रियेला पुढील आठवड्यात प्रारंभ होईल. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ, महाविद्यालयीन पातळ्यांवर हालचालींना वेग आला आहे.
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाची अधिकार मंडळे अस्तित्वात येणार आहेत. अधिसभा, विद्या परिषद, विविध विद्याशाखांच्या एकूण ४७ अभ्यास मंडळांवरील १८८ जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. यातील नोंदणीकृत पदवीधर गटासाठीची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात १४ हजार ४०० पदवीधर मतदानासाठी पात्र ठरले आहेत. अपात्र आणि दुरुस्तीसाठी सुमारे चार हजार जणांचे अर्ज आहेत. संस्था, प्राचार्य, शिक्षक गटांसाठीची महाविद्यालयनिहाय मतदारांची माहिती संकलनाचे काम विद्यापीठ पातळीवर सुरू आहे.
आॅक्टोबरमध्ये दिवाळी झाल्यानंतर अधिकार मंडळांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीच्या प्रक्रियेला पुढील आठवड्यामध्ये प्रारंभ होईल. यात सुरुवातीला कच्ची यादी जाहीर केली जाईल. यावर हरकती नोंदविण्यासाठी पाच दिवसांची मुदत असणार आहे. यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. यादी प्रसिद्ध झाल्यावर उमेदवारी अर्ज भरणे, त्यांची छाननी, माघार, आदी स्वरूपातील प्रक्रिया होणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांत कच्ची मतदार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या मैदानात उतरणाºया शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी, अभाविप, आदी संघटनांकडून कार्यवाहीला वेग आला आहे. मतदार नोंदणीसाठी दाखल केलेल्या अर्जांतील त्रुटींची पूर्तता, गटनिहाय उमेदवारांची निवडीसाठी चाचपणी, आदी कार्यवाही संघटनांकडून सुरू आहे.या जागांसाठी होणार मतदानअधिसभा (कंसात जागा) : शिक्षक, प्राचार्य आणि नोंदणीकृत पदवीधर गट (प्रत्येकी १०), संस्था प्रतिनिधी (६), विद्यापीठ कॅम्पसवरील शिक्षक गट (३). विद्या परिषद : शिक्षक गट (८). एकूण ४७ अभ्यास मंडळे (प्रत्येकी ३) : १४१.अभ्यास मंडळे अशीविज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा : १९, वाणिज्य व व्यवस्थापन : ४, मानव्यशास्त्र : १४, आंतरविद्याशाखीय : २८.