कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायतीत एक किंवा दोन जागांसाठी निवडणूक लागली आहे. या जागांसाठी उद्या शुक्रवारी मतदान होणार आहे. या गावांमध्ये पाच ते आठ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम लागलेला असून त्यापैकी ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे सध्या ३८६ ग्रामपंचायतींसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ग्रामपंचायतीतील लोकसंख्येनुसार येथील सदस्य संख्या ठरते. ही संख्या ५ ते अगदी १७ पर्यंतदेखील असते. या ४३३ ग्रामपंचायतींमध्ये ४ हजार २७ सदस्य असणार असून त्यापैकी ७२० सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायतींमध्ये एक, दोन किंवा फार तर तीन जागांसाठी निवडणूक लागली आहे. यात राधानगरीतील चार, गडहिंग्लजमधील एक, चंदगड, भुदरगड व पन्हाळ्यातील प्रत्येकी दोन दोन तर करवीर व गगनबावड्यातील एक -एक ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या गावांमध्ये पाच ते सहा सदस्य बिनविरोध आले आहेत. उर्वरित जागांसाठी दोन ते चार उमेदवार रिंगणात आहेत. काही ठिकाणी दोन जागांवर एकाच व्यक्तीने अर्ज भरला आहे. या जागांसाठी शुक्रवारी मतदान होत असून १८ तारीखला मतमोजणी होणार आहे.एकूण प्रभाग संख्या : १ हजार ४९१ , बिनविरोध प्रभाग १४६एकूण सदस्य संख्या : ४ हजार २७ , बिनविरोध सदस्य संख्या ७२०दोन तीन जागांसाठी निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती
गावाचे नाव : बिनविरोध : निवडणूक लागलेल्या जागा
- हरळी बुद्रुक (गडहिंग्लज) : ८ : १
- पंडेवाडी (ता. राधानगरी) : ८ : १
- ऐनी (ता. राधानगरी) : ६ : ३
- चाफोडी तर्फ ऐनघोल (ता. राधानगरी): ४ : ३
- सावर्दे वडाचीवाडी (ता. राधानगरी): ७ : २
- बुक्कीहाळ (चंदगड) : ५ : २
- चिंचणी (चंदगड) : ६ : १
- निकमवाडी (पन्हाळा) : ६ : १
- हरपवडे (पन्हाळा) : ६ : १
- पाळ्याचाहुडा (भुदरगड) : ६ : १
- हेळेवाडी (भुदरगड) : ५ : २
- वेतवडे (गगनबावडा): ५ : २
- नांगरगाव (भुदरगड ):४ : ३