प्रास्ताविक सभापती हंबीरराव पाटील यांनी केले.
यावेळी अरुण नरके यांनी शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा या तालुक्यांतून साडेतीनशेचे मताधिक्य घेत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
रणजित पाटील म्हणाले, गोकुळने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक नाडी मजबूत केली आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे.
यावेळी शौमिका महाडिक, माजी आमदार सत्यजित पाटील, बाबासाहेब पाटील यांची भाषणे झाली. यावेळी महिला उमेदवार अनुराधा पाटील, सभापती विजय खोत उपस्थित होते.
चौकट :
ठरावधारक थंड हवेच्या स्थळी
शाहूवाडी, पन्हाळ्यासह कागल, करवीर, भुदरगड या भागातीलही काही मतदारांना आंबा परिसरातील रिसाॅर्टमध्ये स्वतंत्र राहण्याची सोय केली आहे. कोरोना लसीकरणासह सॅनिटायझर, सुरक्षित अंतराची काळजी घेत मतदारांवर कडी नजर ठेवली आहे. काहींची राजकीय मंडळींच्या फार्म हाऊसवरही निवासाची सोय केली आहे.