वडणगे ता. करवीर येथे करवीर पोलीस ठाण्याच्यावतीने वडणगेतील ८० पूरबाधित कुटुंबांना धान्य किट वाटप प्रसंगी ते बोलत होते.
प्राचार्य डॉ. महादेव नरके म्हणाले, आजपर्यंत गावकऱ्यांनी एकत्र येऊन संकटाशी मुकाबला केला आहे. रोटरीसारख्या सामाजिक संघटना, वडणगे भूमिपुत्र, सोशल कनेक्ट यांनीसुद्धा मदतीचा हात दिला आहे. करवीर पोलिसांनी पुढे येऊन पूरबाधित लोकांना मदत करून संवेदनशीलपणाचे दर्शन घडविले आहे. यावेळी
पंचायत समिती सदस्य इंद्रजीत पाटील, उपसरपंच पूजा मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य सयाजी घोरपडे, सूरज पाटील, भारती शेलार, युवक राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुनील परीट, रणजित पाटील, सचिन जाधव उपस्थित होते.
फोटो : १३ वडणगे मदत
वडणगे ता. करवीर येथे करवीर पोलीस ठाण्याच्यावतीने पूरबाधित कुटुंबांना धान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, इंद्रजित पाटील, प्रा. महादेव नरके, सुनील परीट, सयाजी घोरपडे, सूरज पाटील, अमर टिटवे उपस्थित होते.