शहरं
Join us  
Trending Stories
1
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
2
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
3
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
4
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
5
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
6
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
7
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
8
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
9
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
10
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
12
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
13
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
14
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
15
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
16
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
17
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
18
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
19
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
20
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos

कोल्हापूर हद्दवाढ : गड्या आपला गावच बरा, वडणगेकरांचा रस्त्यावरची व न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2022 12:16 PM

हद्दवाढ झाल्यास होणारी करवाढ जनतेला परवडणारी नाही

वडणगे : हद्दवाढ विरोधात रस्त्यावरची व न्यायालयीन लढाई लढा देण्याचा निर्धार वडणगे ता. करवीर येथे पार्वती मंदिरात झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. विलास पोवार होते.

हद्दवाढीसंदर्भात शुक्रवारी सर्वपक्षीय समिती व ग्रामस्थांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रवी बिरजे म्हणाले, कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होईपर्यंत हद्दवाढ होणे अशक्य आहे. मात्र हद्दवाढ ही धोक्याची घंटा आहे. त्याकरिता गाफील राहून चालणार नाही. वेळप्रसंगी याचिका दाखल करून न्यायालयीन लढ्याची तयारी सुरू ठेवू या.सरपंच सचिन चौगुले म्हणाले, हद्दवाढीसाठी नेतेमंडळी प्रतिकूल आहेत. हद्दवाढ झाल्यास होणारी करवाढ जनतेला परवडणारी नाही. महापालिकेचे कारभारी शेतकऱ्यांना भूमिहीन करतील. त्यामुळे हद्दवाढीविरोधात न्यायालय आणि रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज राहिले पाहिजे.

हद्दवाढीसाठी आग्रह धरणारे कोल्हापुरातील नागरिकांना काय सुविधा देतात, असा सवाल विलास पोवार यांनी उपस्थित केला. हद्दवाढीला संघटित, असंघटित आणि राजकीय लढा देण्याची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी निषेधाचे फलक लावून व्यापक जनजागृती करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

प्राचार्य महादेव नरके म्हणाले, ग्रामीण जनतेकडूनही शहरातील लोकांचा फायदा होत आहे. सर्व सेवा असताना हद्दवाढीची गरजच काय, असे त्यांनी ठणकावून सांगितले. आम्हाला शहरात यायचे नाही तर चर्चा कशाला करायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

चौका-चौकांत हद्दवाढीविरोधात निषेधाचे बोर्ड लावण्यात आले. या वेळी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना रविराज बिरजे यांनी उत्तरे दिली.

यावेळी वकील राम खेडकर, कार्तिक पाटील, सुनील भोसले, पिराजी माने, श्वेता नाईक, प्रदीप सुतार, सचिन भोसले, उपसरपंच सयाजी घोरपडे, गोकुळ संचालक एस. आर. पाटील, इंद्रजित पाटील, बाजीराव पाटील, रवींद्र पाटील, पोलीस पाटील उमेश नांगरे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर