वडणगे : लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिल न भरण्याचा व त्यापुढील काळातील वीज बिल हप्त्याने भरण्याचा निर्णय वडणगे ग्रामस्थांनी घेतला. वीज बिल भरणार नाही कृती समितीच्यावतीने येथील पार्वती मंदिरात ग्रामस्थांची बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आला. तोडलेली वीज कनेक्शन त्वरित जोडा अशी मागणी कृती समितीच्यावतीने महावितरणचे शाखा अभियंता जेराॅन गाॅडद यांच्याकडे करण्यात आली. लाॅकडाऊन काळातील वीज बिल भरणार नाही, २० ऑक्टोबर २०२० ते २१ मार्च २०२१ पर्यंतचे वीज बिल हप्त्याने घेण्यात यावे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी सचिन घाटगे, दीपक व्हरगे, ऋषिकेश ठाणेकर, संजय देवणे, सांरग मुरावणे, शेखर कुरणे, नारायण पोतदार, जोतिराम घोडके, विलास कचरे, राजू पोवार, दिलीप प्रभावळे, शिवाजी नावले, शहाजी पाटील, संतोष जाधव, आलिशा मिसाळ, विनोद माने उपस्थित होते.
फोटो : २५ वडणगे वीज बिल
ओळी :- वडणगे (ता. करवीर) येथील ग्रामस्थांच्यावतीने महावितरणचे शाखा अभियंता जेराॅन गाॅडद यांना निवेदन देताना सचिन घाटगे, दीपक व्हरगे, ऋषिकेश ठाणेकर, संजय देवणे, सारंग मुरावणे, जोतिराम घोडके, सुरेश पोवार, आदी उपस्थित होते.