शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

वडगाव, वठारची चौकी अनेक दिवसांपासून बंदच

By admin | Published: May 18, 2015 11:44 PM

उद्घाटनासाठीच उघडला दरवाजा : कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमण्याची गरज

सुहास जाधव-पेठवडगाव -मोठा गाजावाजा करीत जिल्हा पोलीसप्रमुख यांच्या हस्ते दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या दोन पोलीस चौकी बंद आहेत. वडगाव संवेदनशील, तर वठारमधून राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे या दोन चौकींची गरज पोलीस प्रशासनास वाटली. त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात आली. मात्र, या चौक्या अनेक दिवस बंद आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्यानंतरच कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमणार का, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.अलीकडच्या काळात पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात वाढ झाली आहे. तसेच पोलीस ठाण्यावरही हल्ला झाला. त्यामुळे जिल्हा पोलीसप्रमुखांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अंमलबजावणी सुरू केली. वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ गावे येतात. वडगाव शहराचा बाजार हा राज्यात प्रसिद्ध आहे. तसेच ३२ खेड्यांतील ग्रामस्थ भाजीपाला ते जनावरे खरेदी-विक्री करण्यासाठी येतात. तर राष्ट्रीय महामार्ग हा पोलीस ठाण्यातील गावातून जातो. त्यामुळे पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राबविणे हे कौशल्याचे असते. यामुळे पोलीस प्रशासनावर ताण पडतो. यातून मार्ग काढण्यासाठी पोलिसांनी वडगाव व वठार येथे पोलीस चौकी सुरू करण्याचे नियोजन केले. अनेक अडथळ्यांवर मात करीत पोलिसांनी दोन पोलीस चौक्या उभारल्याच ! उद्घाटनानंतर वडगावमधील पोलीस चौकी महिना-दीड महिना सुरू राहिली, तर वठार पोलीस चौकीला कुलूपच आहे. त्यामुळे चौकीच्या उद्घाटनाचा फार्स कशासाठी केला याची विचारणा नागरिकांतून होत आहे.वडगावची पोलीस चौकी पालिका चौकात मोक्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे शहरात कायदा, मारामाऱ्या, बाजारावर नियंत्रण ठेवणे आदीसाठी उपयोगी आहे. तर वठार परिसरात राष्ट्रीय महामार्ग जातो. येथे अपघात, लुटमार आदी प्रसंग घडतात. संबंधित गुन्हेगारावर अंकुश ठेवण्यासाठी दोन्ही पोलीस चौकी सुरू असणे गरजेचे आहे.