शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

वाघमारेचे मोबाइल सीडीआर मागविले,पानसरे यांच्या हत्येतील मारेकऱ्याचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 5:51 AM

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारे याच्याकडे महाराष्ट्र ‘एसआयटी’च्या पथकाने सोमवारी तासभर चौकशी केल्याचे समजते.

कोल्हापूर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारे याच्याकडे महाराष्ट्र ‘एसआयटी’च्या पथकाने सोमवारी तासभर चौकशी केल्याचे समजते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या मारेकºयांपर्यंत पोहोचण्यासाठी वाघमारे याच्याकडून काही पुरावे मिळतात का, याचा शोध पथक घेत आहे. वाघमारेचे पाच वर्षांतील मोबाईल सीडीआर मागविले आहेत. शिवाय, विरेंद्र तावडे, समीर गायकवाड, फरार आरोपी विनय पवार, सारंग अकोळकर यांच्याशी काही कनेक्शन आहे काय, याचा शोध पथक घेत असल्याचे महाराष्ट एसआयटीच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.संशयित वाघमारे याच्या चौकशीमध्ये कॉ. पानसरे व डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येसंबधी काही महत्त्वाचे पुरावे पुढे आल्याच्या वृत्ताने महाराष्टÑात खळबळ उडाली. कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत समीर गायकवाड व विरेंद्र तावडे या दोघांना अटक झाली आहे. या दोघांनाही जामीन मिळाला आहे. तर या हत्येतील संशयित पवार व अकोळकर हे फरार आहेत. ते मडगाव-गोवा बॉम्बस्फोटापासून फरार असल्याने ‘एसआयटी’ला त्यांचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. संशयित वाघमारेच्या चौकशीत कॉ. पानसरे व डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येसंबधी काही महत्त्वाची माहिती हाती लागल्याने महाराष्ट्राचे एसआयटी पथक रविवारी बंगलोरला रवाना झाले. या पथकाने सोमवारी बंगलोर एसआयटीच्या अधिकाºयांशी चर्चा करून वाघमारेकडे तासभर चौकशी केल्याचे समजते. याबाबत मात्र गोपनियता पाळली आहे.>समोर आल्यास वाघमारेला ओळखूगौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी परशुराम वाघमारेला माझ्यासमोर आणले तर त्याला ओळखु, अशी माहिती पानसरे हत्या प्रकरणातील साक्षीदाराने कोल्हापुरात प्रसारमाध्यमांना सोमवारी दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयीत हे धार्मिक संस्थांशी संबंधित आहेत. त्यांचा शुभ, अशुभ गोष्टींवर विश्वास आहे. त्यामुळे पहिल्या हत्येसाठी वापरलेले पिस्तुल शुभ मानून त्याच पिस्तुलातून अन्य दोन हत्या केल्याचा संशयही या साक्षीदाराने व्यक्त केला आहे.