शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

‘हद्दवाढी’साठी केवळ प्रतीक्षाच..

By admin | Published: August 09, 2016 12:15 AM

सरकार अनुकूल : १ सप्टेंबरपूर्वी निर्णय घेणे अनिवार्य; पुढील आठवड्यात पुन्हा बैठक

कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १ सप्टेंबरपासून जिल्हा परिषदेची निवडणूक पूर्व प्रक्रिया सुरू होत आहे. एकदा प्रक्रिया सुरू झाली की, मग त्यात बदल होणार नाहीत. म्हणूनच ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी हद्दवाढीचा निर्णय घेणे राज्य सरकारला अडचणीचे होणार आहे. त्यामुळेच हद्दवाढीसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यास राज्य सरकार विशेषत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील इच्छुक आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हद्दवाढीची आवश्यकता पटविण्यात यश मिळविले. त्यामुळेच २७ जून रोजी हद्दवाढीची अधिसूचना तयार करण्यात आली. विधिमंडळ अधिवेशनाच्या गडबडीत असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी तयार केलेल्या अधिसूचनेवर सहीसुद्धा केली; परंतु त्याची कुणकुण लागलेल्या आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार सुजित मिणचेकर यांनी मुख्यमंत्री दालनात फडणवीस यांची भेट घेतली. विरोध असतानाही जर अधिसूचना जारी झाली तर मोठे आंदोलन सुरू होईल, असा इशाराच तिघा आमदारांनी दिला. त्यामुळे १ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी दोन्ही बाजूच्या प्रमुखांशी चर्चा करून पंधरा दिवसांनी निर्णय देऊ, असे सांगितले. वास्तविक सरकारनियुक्त तज्ज्ञांच्या समितीने अभ्यास करून हद्दवाढीस अनुकूल अहवाल नगर विकास विभागाला दिला होता. तसेच आता निर्णय लांबला तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पूर्व प्रक्रियामुळे अडचणी निर्माण होणार आहेत, याचीही स्पष्ट कल्पना होती. तरीही १ आॅगस्टच्या बैठकीत विरोधकांना दुखावणे त्यांच्या गैरसोयीचे होते. आता पंधरा दिवसांनी म्हणजेच २० आॅगस्टनंतर जर निर्णय घ्यायचा म्हटले तरी पुढील सर्व प्रक्रिया नियमानुसार राबविण्यास किमान एक महिना ते दीड महिना लागणार आहे. त्यामुळेच इच्छा असूनसुद्धा ३० आॅगस्टपर्यंत हद्दवाढीचा निर्णय सरकारला घेता येणे अशक्य आहे. सरकार कितीही सकारात्मक असले तरी निवडणूक आयोगाचे निर्देश आणि कालमर्यादेचे बंधन लक्षात घेता हद्दवाढीचा निर्णय लगेच घेणे अशक्य होण्याची शक्यता आहे.कोल्हापूर शहराच्या हद्दवाढसंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील आठवड्यात पुन्हा एकदा सर्व घटकांची बैठक घेणार आहेत. गुणवत्तेच्या पातळीवर हद्दवाढ होईलच, पण कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण जनतेला विश्वासात न घेता त्यांच्यावर हद्दवाढ लादली जाणार नाही. - चंद्रकांत पाटील, पालकमंत्री