शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

चालता बोलता इतिहास हरपला

By admin | Published: October 09, 2015 11:16 PM

९0 वर्षे पंढरीची वारी : करनूरच्या १0५ वर्षांच्या मुक्ताबाई यांचे निधन

जहाँगीर शेख -- कागल : करनूर (ता. कागल) येथील मुक्ताबाई दत्तात्रय कदम -भोसले या १0५ वर्षीय वृद्धेचे वृद्धापकाळाने निधन झाले. या परिसरातील ‘मुक्ता माळकरीण’ याच नावाने परिचित असणारी ही वृद्धा म्हणजे चालता बोलता इतिहास होता. वयाच्या १३ व्या वर्षी वारकरी संप्रदायाची माळ धारण केल्यापासून आजतागायत त्यांनी विठ्ठल भक्तीत जीवन व्यतीत करीत सलग ९0 वर्षे न चुकता आषाढी एकादशीची पंढरीची वारी केली. गेल्या सप्टेंबर महिन्याच्या २७ तारखेला त्या पंढरपूरला जाऊन आल्या. करनूर ग्रामस्थांनी आणि हनुमान भजनी मंडळाच्या सदस्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात त्यांची अंत्ययात्रा काढली.७ जून १९१0 ही मुक्ताबार्इंची जन्मतारीख. तत्कालीन प्रथेप्रमाणे त्यांचा वयाच्या नवव्या वर्षी कोगनोळी (ता. चिकोडी) येथील दत्तात्रय कदम यांच्याशी बालविवाह झाला. मुक्ताबार्इंना सहा बहिणी, एक भाऊ असा परिवार होता. आई प्लेगच्या साथीने वारली, म्हणून या सहा लहान बहीण-भावांचा सांभाळ करण्यासाठी त्या माहेरी करनूरला परत आल्या, त्या कायमच्याच. वयाच्या १३ व्या वर्षी पंढरीची माळ घातली आणि तेव्हापासून त्या माळकरी म्हणून व्रथस्त जीवन जगत राहिल्या. हातमागावर विणलेली साडी, कपाळावर बुक्का, मुखी पांडुरंगाचे नाव. मात्र, बहिणींची लग्ने, भाऊ शंकर यांचा संसार उभा करण्यापर्यंत या माऊलीने अमाप कष्ट करत भोसले घराण्याला सावरले.ग्रामपंचायत सदस्या, हनुमान भजनी मंडळाच्या एकमेव महिला सदस्या, सगळ्या गावात आदराचे स्थान असणारी मुक्ता माळकरीण म्हणजे चालता-बोलता इतिहास. वयाच्या १३ व्या वर्षांपासून आषाढी एकादशी पंढरपूरच्या वारीला जाण्याचे व्रत त्यांनी जपले. आरती, पाळणा, ओव्या, अभंग, भारुडे, हरीपाठ, रामायण, महाभारत सर्व तोंडपाठ. कोणतीही शाळा न शिकता हे ज्ञान त्यांनी आत्मसात केले होते. इंग्रजांचा कालखंड, स्वातंत्र्य चळवळ, कागलचे संस्थानिक राजे, करवीरकर छत्रपती याचे ‘छबीने’ तत्कालीन गाव रचना, आणीबाणीचा कालखंड आदी गोष्टींवर त्या भरभरून बोलत. गेली दोन वर्षे त्यांची तब्येत बिघडली होती. २०१४ मध्ये आषाढी एकादशीची वारी चुकली म्हणून त्या बेचैन झाल्या. शेवटी घरच्यांनी २७ सप्टेंबर २0१५ रोजी त्यांना पंढरीला नेले. शुक्रवारी (दि. ९) त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन भाचे, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, रविवारी आहे.सबला नारीबालविवाह झाला मात्र त्यानंतर माहेर सावरण्यासाठी त्या परत सासरी गेल्या नाहीत. १९२५ च्या क ालखंडापासून पंढरीला तरुण वयात एकटीने जाण्याचे व्रत त्यांनी जपले. आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञान ही संपादन केले. तेही कोणत्याही शाळेत न जाता. ग्रामपंचायत सदस्या आणि पुरुषांच्या भजनी मंडळातील एकमेव महिला सदस्या. सबला नारीची व्याख्याच मूक्ताईने आपल्या जगण्यातून सांगितली.