गडहिंग्लज/कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी दुपारी तीन नंतर मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसापासून उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला. शहरातील सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. कागल, तसेच पन्हाळा तालुक्यात तर ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. मुगळी (ता.गडहिंग्लज) येथे भिंत पडून तिघेजण जागीच ठार झाले.मुगळी (ता.गडहिंग्लज) येथे भिंत पडून तिघेजण जागीच ठार झाले असून मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. घटनास्थळी मिळालेल्या माहिती नुसार नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील अजित अर्जुन कांबळे (वय ४८, रा. नांगनूर) आणि बहिण गिरीजा यांच्या पतीचे निधन झाल्याने ती माहेरी नांगनूर येथे राहत. अजित, गिरीजा व त्यांच्या दुसऱ्या भावाची पत्नी संगीता बसाप्पा कांबळे (वय ४५, रा. नांगनूर) हे तिघेही गुरुवारी गिरीजा हिच्या सासूला पाहण्यासाठी हरळी येथे गेले होते.दरम्यान, ते गावी परतत असताना जोरदार पावसाला पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचावासाठी त्यांनी मुगळीपासून जवळ असलेल्या नूल मार्गावर असलेल्या भीमा शंकर माने यांच्या पोल्ट्रीजवळ आसरा घेतला. यावेळी वादळाच्या वेगाने अचानक भिंत कोसळून तिघेही गाडले गेले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
मुगळी येथे भिंत पडून तिघेजण गाडले, कोल्हापूर जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 7:45 PM
Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी दुपारी तीन नंतर मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसापासून उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला. शहरातील सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. कागल, तसेच पन्हाळा तालुक्यात तर ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. मुगळी (ता.गडहिंग्लज) येथे भिंत पडून तिघेजण जागीच ठार झाले.
ठळक मुद्देमुगळी येथे भिंत पडून तिघेजण गाडलेकोल्हापूर जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस