कोल्हापूर : सीमकार्ड फोर जी करण्याच्या बहाण्याने १९ लाखांचा गंडा घालणाय्रा भामट्याचा तपास सायबर सेलकडून युद्धपातळीवर सुरु आहे. संबंधित बँक आणि मोबाइल कंपनीकडे सोमवारी सविस्तर माहिती मागविली आहे. एका नावाजलेल्या बँकेतून हा प्रकार घडला आहे. गृह कर्जाची रक्कम कर्जदाराच्या खात्यावर एकाच वेळी कशी वर्ग केली. यासह अन्य प्रश्नांची उकल करण्यात सायबर सेलकडून प्रयत्न सुरू आहेत.मोबाईल कंपनीतून बोलतोय, सीम कार्ड फोर जी करावे लागणार असे सांगून लिंकच्या माध्यमातून १९ लाख ६७ हजार रुपयांना ऑनलाईन गंडा घातल्याची फिर्यादी श्रीनिवास जोशी (रा.साळोखे पार्क) यांनी रविवारी सायबर सेलकडे दिली आहे. त्यानंतर सायबर सेलकडून याची चौकशी सुरू झाली आहे. संबंधित बँकेने एकाच वेळी इतकी मोठी रक्कम कर्ज रुपाने खात्यावर कशी जमा केली. याबाबतची सविस्तर माहिती सायबर सेलने बँकेकडे मागितली आहे. तसेच फिर्यादीचा मोबाइल त्याच काळात बंद कसा होता. याबाबतची सर्व माहिती संबंधित मोबाइल कंपनीकडे ही मागितली आहे.प्रतिक्रियातपासासाठीची महत्वाची माहिती मोबाईल कंपनी आणि संबंधित बँकेकडून उद्या, मंगळवारी उपलब्ध होणार आहे. यानंतर ऑनलाईन गंडा घालणाऱ्या भामट्यापर्यंत पोहचणे शक्य होणार आहे.संजय मोरे, पोलिस निरीक्षक, सायबर सेल
ऑनलाईन फसवणूकीचा सायबर सेलकडून युद्धपातळीवर तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 4:16 PM
सीमकार्ड फोर जी करण्याच्या बहाण्याने १९ लाखांचा गंडा घालणाय्रा भामट्याचा तपास सायबर सेलकडून युद्धपातळीवर सुरु आहे. संबंधित बँक आणि मोबाइल कंपनीकडे सोमवारी सविस्तर माहिती मागविली आहे. एका नावाजलेल्या बँकेतून हा प्रकार घडला आहे. गृह कर्जाची रक्कम कर्जदाराच्या खात्यावर एकाच वेळी कशी वर्ग केली. यासह अन्य प्रश्नांची उकल करण्यात सायबर सेलकडून प्रयत्न सुरू आहेत.
ठळक मुद्देऑनलाईन फसवणूकीचा सायबर सेलकडून युद्धपातळीवर तपासनावाजलेल्या बँकेत घडला हा प्रकार