शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

प्रभाग कानोसा - प्रभाग क्रमांक ५४ - चंद्रेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:19 AM

विद्यमान नगरसेविका - शोभा बोंद्रे ‘चंद्रेश्वर’ प्रभागात दोन भावांत लढत : बोंद्रे-खराडे आमनेसामने : तडजोडीचे प्रयत्न असफल भारत चव्हाण ...

विद्यमान नगरसेविका - शोभा बोंद्रे

‘चंद्रेश्वर’ प्रभागात दोन भावांत लढत : बोंद्रे-खराडे आमनेसामने : तडजोडीचे प्रयत्न असफल

भारत चव्हाण / लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक किती मोठ्या चुरशीची आणि राजकीय अस्तित्वाची ठरणार आहे याची प्रचीती शिवाजी पेठेतील ‘प्रभाग क्रमांक ५४- चंद्रेश्वर’ येथे आली. प्रभागांतून बोंद्रे -खराडे या नावाजलेल्या घराण्यांचे वारसदार एकमेकांविरुद्ध निवडणूक लढणार आहेत. दोन्ही घराण्यांत कोणी निवडणूक लढवावी यावर विचारमंथन झाले, पर्याय दिले गेले; पण एकमत न झाल्यामुळे अखेर माजी नगरसेवक इंद्रजित पंडितराव बोंद्रे व शिवतेज इंद्रनील ऊर्फ अजित खराडे या दोन बंधूंत लढत होऊ घातली आहे. शिवतेज हे इंद्रजित यांचे आत्येभाऊ आहेत.

शिवाजी पेठेत बोंद्रे आणि खराडे ही राजकीय घराणी सुपरिचित आहेत. आतापर्यंत महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही घराण्यांतील सदस्य एकमेकांविरुद्ध कधी लढले नाहीत. त्याला कारण म्हणजे कै. महिपतराव बोंद्रे होय. त्यांचा शब्द म्हणजे अंतिम असायचा. त्यांच्या शब्दाला मान देऊनच या घराण्यांनी तडजोडी केल्या. त्यामुळे सई खराडे, इंद्रजित बोंद्रे, शोभा बोंद्रे नगरसेवक झाले. नंतरच्या काळात सई खराडे व शोभा बोंद्रे महापौर झाल्या. त्याला महत्त्वाचे कारण दोन घराण्यांतील एकी होती. मोठ्यांच्या शब्दाला मान व एकमेकांवरील विश्वास होता.

परंतु होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीत या घराण्यांत गडबड झाली. महिपतराव बोंद्रे, सखारामबापू खराडे आज हयात नाहीत. त्यामुळे कोणी कोणाचे ऐकावे आणि कोणी कोणासाठी थांबावे असा प्रश्न निर्माण झाला. प्रत्येकाला नगरसेवक व्हावे असे वाटत आहे. त्यामुळे तडजोडी अयशस्वी झाल्यामुळे शिवतेज खराडे व इंद्रजित बोंद्रे यांनी एकमेकांविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला आहे.

मी ‘चंद्रेश्वर’मधून, तर शिवतेज किंवा त्यांच्या पत्नीने प्रभाग क्रमांक ७३, ८० किंवा ८१ येथून निवडणूक लढवावी, अशी चर्चा आरक्षण पडण्यापूर्वी आमच्यात झाली होती. आरक्षणे जाहीर झाल्यानंतरच्या चर्चेत, मी चंद्रेश्वरमधून लढतोय, शिवतेजच्या पत्नीला प्रभाग क्रमांक ८१ मधून उभे करा, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो असा शब्द दिला; पण त्यांनी तो अमान्य केला, असा दावा इंद्रजित यांनी केला आहे.

तर शिवतेज यांच्या दाव्यानुसार २०१५ ला सई खराडे निवडणूक लढणार होत्या; परंतु महिपतराव बोंद्रे यांच्या शब्दाखातर आम्ही माघार घेऊन शोभा बोंद्रे यांना पाठिंबा दिला. त्यावेळी बोंद्रे यांनीच पुढील निवडणुकीत शिवतेजला संधी द्यायची असे स्पष्ट केले होते. मग त्यांचा शब्द पाळायची जबाबदारी आता इंद्रजित यांच्यावर होती. त्यांनी ती पाळण्यास नकार दिला. मग प्रत्येक वेळी आम्हीच का थांबायचे, असा सवाल शिवतेज यांचा आहे.

इंद्रजित व शिवतेज यांच्यातील चर्चा निष्फल व अयशस्वी ठरल्यामुळे प्रभागाचे वातावरण आता या दोघांभोवतीच फिरणार आहे. कोणता भाऊ निवडणूक जिंकणार आणि कोणता भाऊ हरणार हाच चर्चेचा विषय आहे. तसे बघितले तर बोंद्रे व खराडे घराण्यास समाजसेवेची, महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करण्याची माहिती आहे. सई खराडे यांनी अडीच वर्षे, तर शोभा बोंद्रे यांनी सहा महिने महापौरपद भूषविले आहे. त्यामुळे दोघांनाही प्रशासनाकडून कामे कशी करून घ्यायची याची कलाही अवगत आहे.

इंद्रजित यांची उमेदवारी काँग्रेसकडून निश्चित मानली जाते, तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवतेज खराडेंना उमेदवारी देण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. या दोघांसह शिवसेनेचे कार्यकर्ते प्रकाश सरनाईक निवडणूक लढविणार आहेत; परंतु ते यावेळी शिवसेनेऐवजी भाजपचे कमळ हातात घेणार असल्याचे सांगण्यात येते. या तीन उमेदवारांव्यतिरिक्त प्रभागात अन्य कोणत्या उमेदवाराची चर्चा दिसत नाही. काही जण आपली उमेदवारी निवडणूक जाहीर झाल्यावर ठरविणार आहेत.

- प्रभागात सोडविलेले नागरी प्रश्न -

रंकाळा तलाव ते महालक्ष्मी मार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृह बांधले. रंकाळा तलावावर कमान उभारली. संध्यामठ सांस्कृतिक हॉलचे नूतनीकरण, प्रभागातील चाळीस वर्षांपूर्वीच्या ड्रेनेजलाइन व जलवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. ऐंशी टक्के प्रभागांत रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. गल्लीबोळांत काँक्रीट पॅसेज करण्यात आले आहेत.

-प्रभागातील शिल्लक नागरी प्रश्न-

प्रभागातील वीस टक्के भागांतील डांबरीकरण झालेले नाही. मोहिते बोळात चॅनल बांधण्याचे राहिले आहे. गिरणगल्लीत गटार लाइन बांधलेली नाही.

नगरसेविकेचा कोट -

गेल्या पाच वर्षांत प्रभागातील सर्व कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तरीही सर्वच कामे झाली असा माझा दावा नाही. काही कामे मंजूर आहेत, ती आता सुरू होतील. संध्यामठ हॉलची दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम केल्यामुळे अनेक नागरिकांची साेय झाली आहे.

- गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते -

- शोभा बोंद्रे (काँग्रेस) - २०२५

- प्रियंका इंगवले (ताराराणी आघाडी) ४५४

- सुनीता पन्हाळकर (राष्ट्रवादी) ९०८

- रजनी सरनाईक ( ४८९)