शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

प्रभाग रचनाही संशयाच्या भोवऱ्यात

By admin | Published: August 05, 2015 12:02 AM

महानगरपालिका निवडणूक : इच्छुक उमेदवार, नगरसेवकांच्या तक्रारी

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण निश्चित करताना अधिकाऱ्यांनी गंभीर चूक केल्याची बाब समोर येताच शहरात नव्याने तयार केलेले ८१ प्रभागही आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. भौगोलिक सलगता, प्रगणक यासंबंधीचे नियम डावलून प्रभाग तयार केल्याची सार्वत्रिक तक्रार केली जात आहे. आरक्षण सोडतीला हरकत घेण्यात येणार आहे, तशीच आता उच्च न्यायालयात जाऊन प्रभाग रचनेलाही हरकत घेतली जाण्याची शक्यता आहे.आरक्षणाबाबतची चूक लक्षात आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे फर्मान काढले. त्यातच आता प्रभाग रचनेवरही आक्षेप घेतले जात आहेत. नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार यांनी प्रभाग रचनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. उघडपणे हरकती घेतल्या जात आहेत. ही प्रक्रिया सदोष असल्याचा आरोप होत आहे.(प्रतिनिधी)रोजंदारी कर्मचाऱ्यांनी केले नकाशे शहराची सॅटेलाईट प्रतिमा घेऊन त्याद्वारे प्रभाग करण्याचे काम करण्यात आल्याचे सांगण्यात येते; परंतु ज्यांना शहराचा अभ्यास नाही, गल्लीबोळ, रस्ते माहीत नाहीत, अशा प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांकडून प्रभाग नकाशे तयार करून घेण्यात आले आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा त्यासाठी वापर करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या बांधकाम विभाग तसेच नगररचना विभागाकडील अभियंते, सर्व्हेअर किंवा जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेतले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे एकूण प्रक्रियेवरच आक्षेप नोंदविले जात आहेत. न्यायालयात जाण्याची तयारी प्रभाग रचनेबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी व कॉँग्रेसतर्फे या तक्रारी निवडणूक आयोगाकडे कराव्यात, असे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी पक्षातर्फे अशा तक्रारी एकत्र करण्यात येत आहेत. सर्व तक्रारी घेऊन त्यावर आधारित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्याचा मनोदय शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी मंगळवारी व्यक्त के ला. एकाच गल्लीतील घरेवेगवेगळ्या प्रभागांतसदर बाजार, विचारे माळ, कदमवाडी, जाधववाडी, राजाराम चौक, गंजी माळ या भागांत अशा घटना घडल्या आहेत. एकाच गल्लीतील समोरासमोर असलेली घरे वेगवेगळ्या प्रभागांत गेली आहेत. काही प्रभागांचा परिसर चालून पूर्ण करायचा म्हटला तर दोन-दोन दिवसही पुरणार नाहीत. विक्रमनगर प्रभाग हा चक्क शिवाजी विद्यापीठसमोरच्या कृषी महाविद्यालयापर्यंत जोडला आहे. प्रगणक गट फोडलेच प्रभाग रचना तयार करताना शक्यतो प्रगणक गट फोडले जाणार नाहीत, असे आधी महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले होते. जातनिहाय जनगणनेसाठी हे पाचशे लोकसंख्या असलेले प्रगणक गट तयार करण्यात आले होते. हे अखंड गट प्रभागात जोडले जाणार होते. मात्र, नंतर हे गटही तोडले; त्यामुळे मूळ संकल्पनेला धक्का पोहोचला आहे.