वारणा दूध संघाचे अध्यक्ष
आमदार डॉ. विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१२ ते १९ डिसेंबर या कालावधीत कर्मचारी वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर मोफत आयोजित केले होते. प्रारंभी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या प्रतिमेचे पूजन व शिबिराचे उद्घाटन संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी दूध संघाशी संलग्न असलेल्या सावित्री औद्योगिक महिला संस्था, अमृत कामगार सोसायटी, दूध-साखर वाहतूक या संस्थांतील कर्मचाऱ्यांची अत्याधुनिक उपकरणांद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांना आरोग्याबद्दल सुयोग्य असे मार्गदर्शनही करण्यात आले. सिद्धिविनायक नर्सिंग होमचे डॉ. संजय देसाई, डॉ. संदीप पाटील व इतर टीमने दोन हजार पाचशे कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली.
यावेळी संघाचे पर्सोनल मॅनेजर बी. बी. चौगुले, अकौंटस मॅनेजर सुधीर कामेरीकर, अधिकारी आर. बी. महाजन, श्रीधर बुधाळे, अनिल लंबे, रामचंद्र जाधव, सिद्धिविनायक नर्सिंग होमचे व्यवस्थापक डॉ. शाब्बास इनामदार, डॉ. अमित राजपूत, डॉ. हंकारे, डॉ. पठाण, डॉ. देवकर व डॉ. राकेश पाटील, आदी उपस्थित होते.
.
............................................
फोटो.. तात्यासाहेब कोरेनगर येथे वारणा दूध संघ व सिध्दिविनायक नर्सिंग होम कोल्हापूर यांच्या सहकार्यातून घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्या हस्ते झाले.