गडहिंग्लज : वारंवार सूचना देवूनही कांही विभागांचे अधिकारी मासिक सभेला उपस्थित राहत नाहीत. तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेतल्या जाणाऱ्या सभेचे त्यांना गांभीर्यच नसेल तर अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दारातच ही सभा घेतली जाईल, असा इशारा बाळेश नाईक यांनी दिला.सभापती अनुसया सुतार यांच्या अध्यक्षतेखाली काळभैरी डोंगरावर ही सभा झाली. गटविकास अधिकारी चंचल पाटील यांनी प्रशासनाची बाजू सांभाळलीजवाहर विहीरी व शेळ्या-मेढ्यांच्या शेडच्या थकित अनुदानाच्या मुद्यावरून अमर चव्हाण यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ‘नरेगा’तून विहीरी काढलेल्या शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून पैसे मिळालेले नाहीत. अनुदान देता येत नसेल तर प्रस्तावाचा खर्च गरीब शेतकऱ्यांना का करायला लावला ? असा संतप्त सवालही त्यांनी विचारला.अभियंता संघटना न्यायालयात गेली असल्यामुळे शेळ्या-मेंढ्याच्या प्रस्तावाचे काम रखडल्याचे आणि संबंधित ग्रामपंचायतीकडून कुशल-अकुशल कामांच्या बिलांची पूर्तता झाल्यानंतर विहीरीचे पैसे अदा केली जातील असा खुलासा गटविकास अधिकाऱ्यांनी केला. याप्रश्नी दोन दिवसात बैठक घेवून कार्यवाही करण्याचे आश्वासन उपसभापती तानाजी कांबळे यांनी दिले.काळभैरी डोंगरावरील यात्रास्थळ विकासातंर्गत वाहनतळासाठी आलेला निधी वनखात्याच्या अडवणुकीमुळेच परत गेला. लोकप्रतिनिधींनी झगडून निधी आणला आणि अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे तो परत गेला, असा आरोप करतानाच विकासकामात अडथळा आणलात तर वनखाते हद्दपार करू असा इशाराही त्यांनी दिला. हेमंत कोलेकर यांनीही वनखात्यावर हल्लाबोल केला.चर्चेत इकबाल काझी, स्नेहल गलगले, मीना पाटील, रजनी नाईक, सरिता पाटील यांनीही भाग घेतला. (प्रतिनिधी)तालुक्यातील १९ शाळांत ई-लर्निंगगं्रथालय समृद्धीकरण योजनेत १३५९ पुस्तके जमा झाली असून तालुक्यातील १९ शाळांत ई-लर्निंग सुरू झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी डॉ. कमळकर यांनी दिली. कार्यशाळा घेवून गांडूळखत निर्मितीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे कृषि अधिकारी दिनेश शेट्ये यांनी सांगितले.
‘त्या’ अधिकाऱ्यांच्या दारात सभा घेण्याचा इशारा
By admin | Published: March 01, 2015 10:37 PM