शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

कोल्हापुरात विळखा, सोलापूरला इशारा; राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 7:05 AM

पंचगंगा ४५.५ फुटांवर, मराठवाड्यात हुलकावणी कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ८३ मार्गांवर पुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर / सोलापूर  : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचा विळखा अद्याप कायम आहे. ‘राधानगरी’चे पाच स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने पंचगंगा ४५.५ फुटांवरून वाहत आहे. 

  कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ८३ मार्गांवर पुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. निम्मा जिल्हा पुराच्या पाण्याने वेढल्याने दूध, भाजीपाला आवकेसह जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.  सोलापूर जिल्ह्यातही सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.  पावसामुळे भीमा व सीना नदीला पूर येण्याची शक्यता गृहित धरून  १०५  गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

सांगली : कृष्णेची पातळी ३८ फुटांवरशुक्रवारी सकाळी सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी दुपारी १२ वाजेपर्यंत ३८ फुटांवर गेली होती. अनेक कुटुंबांनी स्थलांतर सुरू केले होते. दुपारपासून पावसाने उघडीप दिली.  कोयना धरणातून ३२ हजार १०० क्युसेकने विसर्ग चालू आहे.

 सातारा : जिल्ह्यात पाच दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसाचा जोर मंदावला आहे. २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला २६७ मिमी तर कोयनानगर येथे १९८ मिलीमीटर झाला. दरम्यान, कोयना धरणातील पाणीसाठा ८१ टीएमसीवर पोहोचला आहे. 

 रत्नागिरी :  जिल्ह्यातील नद्या अजूनही ‘ओव्हरफ्लो’आहेत. काही दिवसांत झालेल्या पावसामुळे नद्या, नाले भरलेले आहेत. खेडमधील जगबुडी, संगमेश्वरमधील शास्त्री आणि राजापूरमधील कोदवली नदी दुथडी वाहत आहेत. या नद्या सध्या इशारा पातळीवरच आहेत.

 छत्रपती संभाजीनगर दीड महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे चार तालुक्यांतील २७२ गावांची तहान ३५५ टँकरद्वारे भागवली जात आहे. अजुनही जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक  पाऊस झालेला नाही.  

हिंगोली : औंढा नागनाथमधील सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने दिसाला. नंदुरबार :  नवापूर तालुक्यातील नद्यांना पूर आला असून रंगावली नदीचे पाणी सखल भागात शिरल्याने ४०० घरे बाधित झाली आहेत. नेसू नदीच्या पुरात एक जण वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. तालुक्याच्या विविध भागात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. 

 सिंधुदुर्ग  :  जिल्ह्यात दोन दिवस पावसाची अधूनमधून संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीपातळीत वाढ झाली असून, आता जिल्ह्यातील २२ धरणे १०० टक्के भरली आहेत. सर्वांत मोठ्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. 

‘पुणे : पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम घ्या’पुण्यात गुरुवारच्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचेती पुलाजवळील पाटील इस्टेट, एकतानगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांत पाणी शिरल्याने चिखल आणि घाण पसरली आहे. घरांमधील चिखलाची महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला दिले. पुरामुळे घरांचे, शेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.

टॅग्स :floodपूर