शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

वनपालाची रायफल चोरट्यांनी पळविली!

By admin | Published: May 19, 2015 12:54 AM

सांगलीतील घटना : अष्टविनायक नगरमधील घरातून चोरी

सांगली : वन विभागातील वनपाल रावसाहेब राजाराम चौगुले (वय ५२) यांचे विश्रामबाग येथील अष्टविनायक नगरमधील घर फोडून चोरट्यांनी एसएलआर (सेल्फ लोडेड रायफल) ही रायफल पळवून नेली आहे. सोमवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे ही रायफल वन विभागाची आहे. ती कार्यालयात जमा न करता चौगुले घरी घेऊन जात होते, अशी माहिती चौकशीतून उघडकीस आली आहे. चौगले हे कुपवाडच्या वन विभाग कार्यालयात गार्ड या पदावर नेमणुकीस आहेत. ४ आॅगस्ट २०१४ रोजी त्यांच्याकडे वनपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी व शुक्रवारी त्यांनी रजा काढली होती. कुटुंबासह ते सांगोल्याला गेले होते. शनिवारी ते कामावर हजर राहिले नाहीत. रविवारी सुट्टी असल्याने ते आले नाहीत. सोमवारी सकाळी ते सांगोल्याहून एकटेच सांगलीत आले. घरी गेल्यानंतर त्यांना, चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी व कोयंडा उचकटल्याचे दिसून आले. कपाटातील साहित्य विस्कटलेले होते. मात्र घरात किमती ऐवज नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. पण घरात रायफल नसल्याचे चौगुले यांच्या लक्षात आले. त्यांनी घरात शोध घेतला. त्यानंतर त्यांनी संजयनगर पोलिसांशी संपर्क साधला.जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत, उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक विश्वनाथ घनवट, संजयनगर ठाण्याचे रवींद्र डोंगरे यांनी चौगुले यांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. सावंत यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी चौगुले यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. ते ज्याप्रकारे माहिती देत आहेत, त्यामध्ये विसंगती आढळून येत आहे. यामुळे रायफलची चोरी झाली आहे की नाही, याबद्दल संशय व्यक्त होत आहे. ही रायफल वन विभागाच्या मालकीची आहे. ड्युटी संपल्यानंतर ती कार्यालयात जमा न करता चौगुले ती घरी नेत होते, अशी माहिती पुढे आली आहे. श्वानपथकास पाचारण केले असता, श्वान घरापासून काही अंतरावर घुटमळले. (प्रतिनिधी)कोम्बिंग आॅपरेशनरायफल चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सायंकाळी गोकुळनगर, इंदिरानगर, वडर कॉलनी परिसरात कोम्बिंग आॅपरेशन केले. रेकॉर्डवरील ११ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली. घरांची झडती घेतली. घरफोडीतील गुन्हेगार अर्जुन अशोक धायगुडे (वय २३, रा. कुपवाड) व सचिन राम गोसावी (१८, इंदिरानगर) यांना अटक केली आहे.