चौकट...
एखादा प्रकल्प उभारत असताना त्याठिकाणी कंपनीचे कार्यालय असणे गरजेचे आहे. फायर सेफ्टीची कोणतीही यंत्रसामग्री कंपनीकडे नाही. सीसीटीव्ही कॅमेरे, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले. प्रकल्प स्थळावर कचरा वेगळा करण्यासाठी लागणारी मशीनरी व मनुष्य बळ अपुरे आहे.
कोट : पालिकेने कंपनीला ठरवून दिल्यानुसार काम होत नसल्याने कचऱ्याचे ढीग वाढत गेले. मात्र, कंपनी बिले अदा करण्याची मागणी करत आहे. कंपनीने काम चालू करून कचऱ्याचे डोंगर कमी करावेत, असे लेखी कळविले आहे, मात्र कंपनीने कोणत्याहीप्रकारे प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे दुसरी कंपनी नेमून कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम दोन दिवसांत चालू होणार आहे.
निखिल मोरे, उपायुक्त, कोमनपा
फोटो: १० कचरा प्रकल्प
कसबा बावड्यातील लाईन बझार येथे झूम प्रकल्पावर शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम गेले महिनाभर बंद असल्याने कचरा टाकण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने अशी गाड्यांची राग लागत आहे. (छाया : दीपक जाधव)