कोल्हापूर : महापालिकेकडून केशवराव भोसले नाटयगृह परिसरातील करण्यात येत असणाय्रा रस्त्याच्या कामावर आता शहर व जिल्हा नागरी कृती समितीचा वॉच राहणार आहे. कृती समिती सदस्य, कृती समितीचे अभियंता आणि महापालिका उपशहर अभियंता यांनी शनिवारी कामाची ठिकणी पाहणी केली.
रस्ता पुन्हा करायाला लागू नये यासाठी दर्जदार रस्ता करा, अशा सूचना केल्या. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर कोर काढून शासकिय प्रयोगशाळेत तपासून घेवू, यामध्ये गैरप्रकार आढळल्यास संंबधित ठेकेदारकडून नव्याने रस्ता करण्यास भाग पाडू, असा इशाराही देण्यात आला.कृती समितीचे रमेश मोरे म्हणाले, शहरातील बहुतांशी रस्त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. काही ठिकाणी नवीन रस्ते करण्याचे काम सुरु आहे. एस्टीमेट नुसार काम होते की नाही याची आम्हास शंका आहे. म्हणून डांबरी रस्ता करणारे तज्ञ इंजिनियर व कार्यकर्ते मिळून केशवराव भोसले नाटयगृहासमोरील सुमारे वीस वर्षानंतर डांबरीकरण होत असलेल्या ठिकाणी पहाणी केली.
महापालिका अभियंता, ठेकेदार यांना योग्य त्या सूचना देऊन रस्त्याची कामे व्यवस्थित करण्याचे आदेश द्यावेत. यावेळी उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, प्रमोद बराले, ठेकेदार गणेश खाडे, कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, संभाजी जगदाळे, अभियंता रमेश पवार, महेश जाधव, गिरीश आरेकर, किशोर घाटगे आदी. उपस्थित होते.