शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

‘जल, ऊर्जा लेखापरीक्षण’ अपूर्ण

By admin | Published: March 06, 2016 10:22 PM

गडहिंग्लज पालिका सभा : ठेकेदारास शेवटची संधी

गडहिंग्लज : तीन वर्षे उलटूनही नळपाणी पुरवठा योजनेचे जल व ऊर्जा लेखापरीक्षण अद्याप पूर्ण न झाल्यामुळे या कामास मुदतवाढ देण्यास तीव्र विरोध झाला. मात्र, तीन महिन्यांची मुदतवाढ देऊन काम पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला शेवटची संधी देण्यात आली. नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांच्या अध्यक्षतेखाली गडहिंग्लज पालिकेची सर्वसाधारण सभा झाली. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मटण मार्केटमधील खुल्या जागेतील चिकन विक्रेत्यांना मुदतवाढ आणि भाडेवाढ, घरकुल योजना, शौचालय अनुदान आणि नळपाणी पुरवठ्याच्या जल व ऊर्जा लेखापरीक्षणाबाबत विशेष चर्चा झाली.रमाई व राजीव गांधी घरकुल योजनेंतर्गत अर्ज केलेल्या सर्व १२ लाभार्थ्यांना घरकुल बांधून द्यावे, अशी आग्रही मागणी सत्ताधारी व विरोधी दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी केली. करवसुलीच्या कामावर परिणाम होणार असल्यामुळे गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीसाठी पालिकेचे कर्मचारी घेऊ नयेत, अशी सूचना नरेंद्र भद्रापूर यांनी केली.पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तोट्या नसणाऱ्या नळांचे कनेक्शन तोडावेत, अशी मागणी किरण कदम व रामदास कुराडे यांनी केली. मात्र, संबंधितांना मुदतीची नोटीस देऊनच कारवाई करावी, अशी सूचना प्रा. स्वाती कोरींनी केली. चर्चेत उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, हारुण सय्यद, बसवराज खणगावे, दादू पाटील, बाळासाहेब वडर, लक्ष्मी घुगरे, अरुणा शिंदे, मंजुषा कदम यांनीही भाग घेतला. मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. (प्रतिनिधी)नगरपालिकेचे नुकसान : संबंधितांवर कारवाईची मागणीतीन वर्षांपूर्वी ठेका देऊनही जल व ऊर्जा लेखापरीक्षणाचे काम पूर्ण न झाल्याने नगरपालिकेचे नुकसान झाले आहे. त्याची संबंधित ठेकेदाराकडून भरपाई करून घ्यावी, अशी मागणी भद्रापूर यांनी केली. अर्थसंकल्पात अपंग कल्याणासाठी ३ टक्के निधीची तरतूद आणि देवदासी छात्र वसतिगृहाचे थकीत भाडे दर्शविण्याची मागणी विरोधी नगरसेवकांनी लेखी पत्राद्वारे केली.उचललेले शौचालय अनुदान दोन लाभार्थ्यांनी पुन्हा जमा केले आहे. याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.