शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

सरपंच पदासाठी इच्छूकांच्या अपेक्षांवर पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:07 PM

कणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठीची सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली. हे आरक्षण जाहीर झाल्यावर सरपंच पदासाठी इच्छूक असलेल्या अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

ठळक मुद्देकणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी पाच सरपंच पदे तर ३१ महिलांसाठी राखीव

कणकवली : कणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठीची सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली. हे आरक्षण जाहीर झाल्यावर सरपंच पदासाठी इच्छूक असलेल्या अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.तालुक्यातील ६३ पैकी ३१ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत . यात अनुसूचित जातीसाठी ५ ग्रामपंचायती राखीव असून त्यातील २ महिलांसाठी , अनुसूचित जमातीसाठी १ तसेच नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी १७ ग्रामपंचायती असून त्यातील ८ महिलांसाठी तर खुल्या प्रवर्गातील ४० पैकी २० ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत .कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात गुरुवारी हार्दिक कराळे या छोट्या बालकाच्या हस्ते चिठ्ठी उचलून आरक्षण सोडत काढण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आर. जे. पवार, निवासी नायब तहसीलदार सुजाता पाटील, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण , पंचायत समिती सभापती मनोज रावराणे आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी जाहीर करण्यात आलेले ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण विविध प्रवर्ग तसेच ग्रामपंचायत नुसार अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहे.

  • अनूसूचित जाती प्रवर्ग - जानवली, तरंदळे,कसवण - तळवडे.
  • अनूसूचित जाती प्रवर्गातील महिला - ओटव, नागवे.
  • अनुसूचित जमाती प्रवर्ग - हळवल.
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग - असलदे, कुरंगवणे- बेर्ले , गांधीनगर, कोळोशी, शिवडाव, कळसुली, डामरे, पियाळी, नांदगाव.
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला -कुंभवडे, करूळ, दारोम , भिरवंडे ,वांयगणी, शेर्पे,सातरल पिसेकामते.
  • सर्व साधारण महिला- माईण,वाघेरी,वारगाव,कासार्डे,आयनल, दारिस्ते,ओझरम,सावडाव,नडगीवे, तोंडवली -बावशी,वरवडे,बिडवाडी, हुंबरट,बोर्डवे,कासरल,शिरवल,फोंडाघाट, ओसरगाव,करंजे,खारेपाटण. 
  • सर्वसाधारण प्रवर्ग - लोरे, बेळणे खुर्द, भरणी, चिंचवली , दिगवळे, आशिये, हरकुळ खुर्द, साकेडी, तळेरे, तिवरे, वागदे, कलमठ, सांगवे, नरडवे, घोणसरी, नाटळ, कोंडये, साळीस्ते , शिडवणे, हरकुळ बुद्रुक या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचा समावेश आहे.

 

टॅग्स :sarpanchसरपंचreservationआरक्षणgram panchayatग्राम पंचायतKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग