कोल्हापूर : गोकुळ दूध संघ निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली; पण न्यायालयाच्या पटलावरही ही याचिका येऊ शकली नाही. आता ती आणखी सात दिवसांनी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे स्थगितीसाठीच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे.आता ही याचिका पटलावर येईपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रियाही पूर्ण होणार आहे.कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील इतर सहकारी संस्थांप्रमाणेच गोकुळच्यानिवडणूक कार्यक्रमाला स्थगिती द्यावी, अशी याचिका गोकुळने उच्च न्यायालयात दाखल केली होती; पण तेथेही प्रारूप याद्या जाहीर झाल्या असल्याने निवडणूक आहे त्या टप्प्यावर स्थगित करता येत नसल्याचे सांगत कार्यक्रम घोषित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असताना, तिकडे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे सत्ताधाऱ्यांचे डोळे लागले होते; पण संध्याकाळ झाली तरी याचिका पटलावर आली नाही. शिवाय आता ती पुढील सात दिवसतरी पटलावर येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांचा भ्रमनिरास झाला. आता ठरल्याप्रमाणे निवडणूक कार्यक्रमाला सामोरे जाणे एवढाच मार्ग शिल्लक राहिला असून, न्यायालयातील याचिका व त्यांचा निकाल ही केवळ औपचारिकता राहिली असल्याचे स्पष्ट झाले.
गोकुळ निवडणूक स्थगितीच्या प्रयत्नांवर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 12:12 PM
Gokul Milk Elcation Kolhapur-गोकुळ दूध संघ निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली; पण न्यायालयाच्या पटलावरही ही याचिका येऊ शकली नाही. आता ती आणखी सात दिवसांनी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे स्थगितीसाठीच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे.
ठळक मुद्देगोकुळ निवडणूक स्थगितीच्या प्रयत्नांवर पाणीनिवडणूक प्रक्रिया सुरू