शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भादोलेमध्ये इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी

By admin | Published: December 23, 2016 12:54 AM

जनसुराज्य-काँग्रेस सामना रंगणार : पंचायत समितीच्या रूपाने इच्छुकांना दुधावरची तहान ताकावरच भागवावी लागणार

नाना जाधव --भादोले जिल्हा परिषद मतदारसंघ इतर मागासवर्ग जाती (ओबीसी) महिलांसाठी राखीव झाल्याने इच्छुकांचे मनसुबे उधळले आहेत. तसेच भादोले पंचायत समिती अनुसूचित जमाती पुरुषासाठी राखीव झाला आहे. तर टोप पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण पुरुष राहिल्याने जिल्हा परिषदेच्या इच्छुकांना दुधावरची तहान ताकावरच भागवावी लागणार आहे. या मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे वर्चस्व असून, आगामी निवडणुकीत जनसुराज्य व काँग्रेस यांच्यामध्ये खरी लढत होणार आहे.भादोले मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसची ताकद होती. २००७ च्या निवडणुकीत आमदार अमल महाडिक हे काँग्रेस पक्षातून विजयी झाले होते; परंतु जनसुराज्य पक्षाच्या एंट्रीने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला तडा गेला. २०१२ च्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षातून मंदाताई घाटगे या ४००० च्या मताधिक्याने निवडून आल्या. सध्याही काँग्रेस-जनसुराज्य पक्ष अशीच लढतीची शक्यता दिसून येते.शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांचेही या निवडणुकीत उमेदवार असणार आहेत. जरी पंचरंगी लढतीचे चित्र दिसत असले, तरी अंबपचे बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने, कार्याध्यक्ष विकासराव माने यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच भाजपचे आमदार अमल महाडिक यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.नुकत्याच झालेल्या वडगाव नगरपालिका निवडणुकीत भाजप-जनसुराज्य अशी युती करण्यात आली होती. जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप-जनसुराज्य युती कायम राहिल्यास काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे. सध्या तरी काँग्रेसमधून माजी जि. प. सदस्य रहिमान मुल्लानी यांच्या पत्नी मुमताज मुल्लानी यांचे नाव चर्चेत आहे. जनसुराज्य पक्षाकडून ग्रामपंचायत सदस्या शोभा कोळी, पुष्पांजली क्षीरसागर, निसार बेगम सनदे यांचे नाव चर्चेत आहे. भाजपकडून अन्वरबी जमादार यांचे नाव चर्चेत आहे. शिवसेनेकडून माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण यांच्या पत्नी सुरेखा चव्हाण यांचेही नाव चर्चेत आहे. तर स्वाभिमानी पक्षाकडून शालन रामदास वड्ड यांचे नाव आघाडीवर आहे.भादोले पंचायत समिती अनुसूचित जाती पुरुष राखीव असून, येथे जनसुराज्यकडून माजी जि. प. सदस्य दत्ताजी घाटगे यांचा मुलगा राज घाटगे, अनिल अवघडे इच्छुक आहेत. काँग्रेसकडून उमेश अवघडे इच्छुक आहेत. भाजपकडून सचिन कांबळे, सागर कांबळे, दीपक ढाले यांची नावे आघाडीवर आहेत. शिवसेनेकडून अनिल दबडे, तर आरपीआयकडून प्रकाश कांबळे इच्छुक आहेत. टोप पंचायत समिती सर्वसाधारण असून, इच्छुकांची मांदियाळी पाहता यावेळी नेत्यांचा कस लागणार आहे. ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील, माजी सभापती बाबासो पाटील, सेनेकडून सागर चोपडे, जनसुराज्य पक्षाकडून विकासराव माने यांची नावे आघाडीवर आहेत. जर विकासराव माने जनसुराज्य पक्षाकडून उभे राहिले, तर जि. प. मतदारसंघातील जनसुराज्यला लाभ मिळण्याची शक्यता आहे.पक्षांची शक्तिस्थळे जनसुराज्य : विजयसिंह माने, दत्ताजी घाटगे, रावसो पाटील, महेंद्र शिंदे राष्ट्रीय काँग्रेस : धोंडिराम पाटील, रहिमान मुल्लाणी, जयवंतराव आवळे यांचे कार्यकर्ते भाजप : पी. डी. पाटील, दीपक ढाले, अमल महाडिक, त्यांचे कार्यकर्ते शिवसेना : आकाराम दबडे, चंद्रकांत जमादार, महेश चव्हाण, विठ्ठलपंत पाटील यांचे कार्यकर्ते