कोल्हापूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या पाणंद मुक्तीच्या मोहिमेचा भाग म्हणून निटवडे (ता. करवीर) येथील गावातून शिवेकडे जाणारी सुमारे एक किलोमीटरची पाणंद अतिक्रमण काढल्याने मोकळी झाली. या पाणंदीने शेतकऱ्यांची कुंभी व दालमिया कारखान्याला ऊस वाहतूक होतेच शिवाय गावाच्या येण्याजाण्याचा ही एकमेव पाणंद आहे. ती रुंद झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त झाले.
सुमारे सत्तर वर्षाहून या पाणंदीतून गावाची वहिवाट आहे. परंतु झाडे झुडपे व अतिक्रमणांनी ती व्यापली होती. महसूल जत्रे अंतर्गत ती अतिक्रमण मुक्त करण्यासाठी बालिंगा मंडळ अधिकारी एन.बी.जाधव, तलाठी सुरेखा नेजकर, सरपंच तुकाराम व्हरांबळे, उपसरपंच मंगल पाटील, ग्रामसेवक एस.ए.जांबिलकर, पोलीस पाटील सविता पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सागर पाटील यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली.
०५०३२०२१-कोल : निटवडे फोटो
करवीर तालुक्यातील निटवडे गावातून शिवेकडे जाणाऱ्या पाणंदीतील महसूल जत्रे अंतर्गत अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी महसूलचे अधिकारी व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.