कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे दुरुस्तीच्या कारणास्तव वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने शहरातील ए, बी व ई वॉर्ड व त्यांना संलग्नित उपनगरांतील पाणीपुरवठा सोमवारी व मंगळवारी ( दि. २९ व ३०) अपुरा व कमी दाबाने होणार आहे.शिंगणापूर योजनेवरून वितरित होणाऱ्या साळोखेनगर, कळंबा फिल्टर, पाण्याचा खजिना, पद्मावती व जीएसआर, जरगनगर, शेंडा पार्क, आर.के.नगर, राजारामपुरी, कावळा नाका व संप, राजारामपुरी नऊ नंबर शाळा, राजेंद्रनगर, आदी टाकीवर अवलंबून असणाऱ्या भागातील नळ कनेक्शनधारकांना दैनंदिन होणारा पाणीपुरवठा सोमवारी बंद राहील व मंगळवारी होणारा पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे.या भागात पाणी येणार नाही -जीवबा नाना जाधव पार्क, नाना पाटीलनगर, आपटेनगर, कणेरकरनगर, राजोपाध्ये नगर, तुळजाभवानी कॉलनी, साने गुरुजी वसाहत, क्रशर चौक, साळोखेनगर, कळंबा फिल्टर, तपोवन, एल. आय. सी. कॉलनी, हनुमाननगर, रेसकोर्स नाका, गंजीमाळ, शेंडा पार्क, सुभाषनगर, आर. के.नगर, बळवंतनगर.तसेच ई वॉर्डमधील राजारामपुरी, मातंग वसाहत, बागल चौक, शिवाजी उद्यमनगर, शास्त्रीनगर, सागरमाळ, राजेंद्रनगर, वैभव सोसायटी, दौलतनगर, शाहूनगर, माळी कॉलनी, टाकाळा, वड्डवाडी, सम्राटनगर, शिवाजी विद्यापीठ, इंगळेनगर, काटकर माळ, रुईकर कॉलनी, मार्केट यार्ड, लोणार वसाहत, शिवाजी पार्क, शाहूपुरी, कनाननगर, स्टेशन रोड, लाईन बझार, कसबा बावडा, रमणमाळ, महावीर कॉलेज, विक्रमनगर, जाधववाडी, बापट कॅम्प, ताराबाई पार्क, सदर बझार, कदमवाडी.
सोमवारी पाणीपुरवठा खंडित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 6:35 PM
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे दुरुस्तीच्या कारणास्तव वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने शहरातील ए, बी व ई वॉर्ड व त्यांना संलग्नित उपनगरांतील पाणीपुरवठा सोमवारी व मंगळवारी ( दि. २९ व ३०) अपुरा व कमी दाबाने होणार आहे.
ठळक मुद्देकोल्हापूर शहर,उपनगरांतील पाणीपुरवठा सोमवारी खंडित होणारवितरण कंपनीतर्फे दुरुस्ती, अपुरा व कमी दाबाने पुरवठा