शांताराम तेलवणकर यांचा मुलगा गजानन, पुतण्या सुरेश तेलवणकर यांनी ‘लोकमत’मधील ‘मृत्यूचा फेरा’ हे सदर वाचले होते, त्यावरून आपण असा वेगळा प्रयत्न करावा, असे त्यांना वाटत होते. शाळेत शिक्षकांकडे चौकशी केली असता शाळेतील पिण्याच्या पाण्याची टाकी फुटली असल्याचे समजले . त्यानुसार त्यांनी शांताराम तेलवणकर यांच्या उत्तरकार्यादिवशी शाळेला एक हजार लिटर पाणी साठवण क्षमतेची पाण्याची टाकी पोहोच केली त्यामुळे शाळेतील मुलांसाठी तसेच परसबाग, शालेय बगीचा यासाठीचा पाणी प्रश्न सुटला आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक केशव गुरव, शिक्षक अनिल कांबळे, सूर्यकांत जांभळे, शालेय समिती अध्यक्ष सुनील पाटील, माजी उपसरपंच रामचंद्र पाटील, सुरेश तेलवणकर, आनंद तेलवाणकर आदी उपस्थित होते.
चौकट:-
उत्तरकार्याच्या खर्चाला फाटा देऊन तो खर्च आपल्या गावच्या शाळेसाठी देणेचे तेलवणकर कुटुंबाचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहेच. दु:खामध्येही शाळेला शैक्षणिक, भौतिक सुविधा उपलब्ध करणाऱ्या तेलवणकर कुटुंबाचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. नागरिकांनी अशा कार्यक्रमातील अनावश्यक खर्च टाळून सामाजिक, शैक्षणिक कार्यास मदत करावी.
अनिल वाघमारे
गटविकास अधिकारी,पं. स. शाहूवाडी
फोटो:- काटे (ता. शाहूवाडी) येथील स्वर्गीय शांताराम तेलवणकर यांच्या उत्तरकार्यादिवशी शाळेला पाण्याची टाकी देताना तेलवणकर कुटुंबीय.